'लव्ह घाटकोपर' सेल्फी पॉइंट

 Ghatkopar
'लव्ह घाटकोपर' सेल्फी पॉइंट
'लव्ह घाटकोपर' सेल्फी पॉइंट
'लव्ह घाटकोपर' सेल्फी पॉइंट
'लव्ह घाटकोपर' सेल्फी पॉइंट
'लव्ह घाटकोपर' सेल्फी पॉइंट
See all

घाटकोपर (पू) - जसवंत राय मेहता उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ ‘लव्ह घाटकोपर’ सेल्फी पॉइंट बनवण्यात आलाय. या पॉइंटच्या उद् घाटनासाठी अभिनेत्री विद्या बालन उपस्थित होती. विद्या आगामी सिनेमा ‘कहानी - 2’ च्या प्रमोशनसाठी आली होती. विद्यानं सेल्फी काढून या पॉइंटचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला प्रभाग समितीचे अध्यक्ष हारुन खानही उपस्थित होते.

काँग्रेस नगरसेवक आणि महापालिकेतले विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा यांनी या सेल्फी पॉइंटची निर्मिती केली आहे. नगरसेवक निधीतून त्यांनी या उद्यानाचं नूतनीकरण आणि सेल्फी पॉइंट तयार केलाय. या उद्यानात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्थाही आहे.

Loading Comments