Advertisement

मुंबईत भरलेल्या 'माणदेशी' महोत्सवाला भेट द्याच

बारा बलुतेदार हे आपण फक्त पुस्तकात वाचलेले असते. पण ग्रामसंस्कृतीचा कणा असलेले सुतार, लोहार, कुंभार यांची थेट कला येथे पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळणार आहे. इथं आपण स्वत:च्या हाताने मडकं वा लाटणं बनवू शकता किंवा फेटा बांधायचा कसा हे शिकू शकता.

SHARES

गावाकडील गावपण अनुभवायची संधी मुंबईकरांसाठी धावून आली आहे. मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिराच्या पटांगणात 'माणदेशी महोत्सव' भरवण्यात आला आहे. या महोत्सवाच्या निमित्तानं साताऱ्यातील माणदेशी माणसं तुमच्या भेटीला आली आहेत. माण हा सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी भाग आहे. या भागातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशानं आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना झाली. दरवर्षी माणदेशी फाऊंडेशनतर्फे ‘माणदेशी महोत्सव’ मुंबईमध्ये भरवला जातो. यावर्षी या महोत्सवाचं तिसरं वर्ष आहे.


महोत्सवाची खासियत

तुम्हाला महोत्सवामध्ये माणदेशाची खासियत असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती आणि खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या हे साहित्य खरेदी करता येणार आहे. याशिवाय माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य तसंच चटकदार चटण्या, मसाल्यांची चव चाखता येणार आहे. त्याचसोबत घरच्या घरी तयार केलेल्या खास सातारी टच असलेल्या विविध चटण्या, पापड, लोणचं, खर्डा, ठेचा, शेव- पापड ते अगदी पेयांपर्यंत सारं काही इथं उपलब्ध आहे. हातमागावरच्या आणि हातानं कलाकुसर केलेल्या शाली, साड्या, दुपट्टे, ब्लाऊज, ड्रेस मटेरिअल्स देखील खरेदी करता येणार आहेत. माणदेशी महोत्सवामुळे ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांना आपली कला दाखवण्याचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.


बारा बलुतेदार मुख्य आकर्षण

बारा बलुतेदार हे आपण फक्त पुस्तकात वाचलेले असते. पण ग्रामसंस्कृतीचा कणा असलेले सुतार, लोहार, कुंभार यांची थेट कला येथे पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळणार आहे. इथं आपण स्वत:च्या हाताने मडकं वा लाटणं बनवू शकता किंवा फेटा बांधायचा कसा हे शिकू शकता. तसंच चपला तयार करणारे, दागिने बनविणारे किंवा कपडे विणणाऱ्या कलाकारांची कला पाहू शकता. दर संध्याकाळी माणच्या मातीचं दर्शन घडविणारे खेळ, लोकनृत्य, लोकसंगीत यांचा देखील आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. खास माण तालुक्यातील गाझी लोकनृत्याचा आस्वाद देखील या महोत्सवादरम्यान घेता येणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा