Advertisement

मुंबईकर्स..ड्राईव्ह सेफ!


SHARES

जोगेश्वरी - श्यामनगर तलावाजवळ रविवारी सकाळी 6 वाजता जोगेश्वरी भटकंती कट्टा ग्रुपची सर्व मंडळी लोहगडावर ट्रेकिंगला जाण्यासाठी जमली होती. 15 दुचाकी घेऊन ग्रुपच्या 30 सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. रोड सेफ्टी हे या ट्रेकिंगचे उदिष्ट आहे.

लोहगडावर पोहोचेपर्यंत या ग्रुपची मंडळी विविध चार ठिकाणी थांबून रोड सेफ्टीबाबत जनजागृती करणार असल्याची माहिती ग्रुपचे अध्यक्ष रोहित नागप यांनी दिली. तसेच फक्त रोड सेफ्टी नव्हे तर ही मंडळी दुर्ग स्वच्छता मोहीम, आदिवासी पाड्यांवर फळे आणि कपडे वाटप यासारखे विविध उपक्रम राबवणार आहेत. जोगेश्वरी भटकंती कट्टा या ग्रुपमध्ये विरार, वसई, ठाणे येथे राहणारी मंडळीही आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा