Advertisement

महिलांच्या सुरक्षेसाठी 'सोनाटा अॅक्ट'


महिलांच्या सुरक्षेसाठी 'सोनाटा अॅक्ट'
SHARES

लोअर परळ - महिलांच्या सुरक्षेसाठी टायटन कंपनीने 'सोनाटा अॅक्ट' या नावानं घड्याळांचं एक नवं कलेक्शन आणलं आहे. याचं उद्घाटन लोअर परळ येथील सेंट रेगीस हॉटेलमध्ये करण्यात आलं.

महिलांच्या सुरक्षेच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या या घड्याळात एका नव्या टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हे घड्याळ तुमच्या मोबाइलमधल्या अॅपशी जोडलेलं असतं. ब्लूटूथद्वारे हे अॅप घड्याळाशी जोडलं जातं. घड्याळ वापरणारी महिला या अॅपद्वारे किमान 10 जणांशी संपर्क करू शकते. घड्याळ्याच्या डायलवर 8 क्रमांक असतो, तिथे एक अलर्ट बटण लावण्यात आलंय. संकटसमयी मदत हवी असल्यास महिलेनं हे बटण दाबल्यास आधीच ठरवून ठेवलेल्या 10 सहकाऱ्यांना अलर्ट केलं जातं. ही महिला कुठे आहे, याचीही माहिती मिळू शकते. स्मार्टफोन नसलेल्यांना संदेशाद्वारे माहिती मिळू शकते. वर्ल्ड ऑफ टायटन, लाइफस्टाइल, शॉपर्स स्टॉप आणि टायटनच्या अधिकृत दुकानांतून 2,749 ते 2,999 रुपयांदरम्यान सोनेरी आणि चंदेरी अशा दोन रंगांमध्ये हे कलेक्शन उपलब्ध आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा