माय-फाय जोमात, प्रतिस्पर्धी कोमात

Pali Hill
माय-फाय जोमात, प्रतिस्पर्धी कोमात
माय-फाय जोमात, प्रतिस्पर्धी कोमात
माय-फाय जोमात, प्रतिस्पर्धी कोमात
माय-फाय जोमात, प्रतिस्पर्धी कोमात
See all
मुंबई  -  

मुुंबई - रिलायन्स जिओ मोबाईल एका बाजूला GSM 4G कनेक्शनची धूम माजवत आहेत. तर दुसरीकडे जिओ माय-फाय डोंगलनेसुद्धा बाजारात इतर प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली आहे.

1999 रुपयांच्या स्वागत प्लॅनमध्ये तीन महिने अमर्याद हाय स्पीड डेटा अगदी फ्री असल्याने मुंबईकरांनी माय फाय वर प्रचंड लूट चालवली आहे. 2.4 GHz वर चालणारे हे वाय फाय डोंगल 2600 mAH बॅटरीवर असल्याने इतर डोंगल पेक्षा उजवे ठरले आहे. तसेच इतर प्रतिस्पर्ध्यांच्या किमती प्लॅन पुढे जिओ एक पाऊल पुढेच आहे. या माय-फायला एका वेळेस दहा मोबाइल किंवा कॉम्पुटर जोडू शकतो, असा दावा जिओ या युनिटद्वारे करत आहे. या युनिट व्यतिरिक्त अजून 4 मॉडेल्स विविध इतर वैशिष्टे घेऊन जिओ बाजारात येत आहे. या सगळ्या इंटरनेट जगात होणाऱ्या उलठापालथीत ग्राहकांचा फायदा होत आहे, हे मात्र नक्की.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.