Advertisement

'निसर्ग' चक्रीवादळ Live Update

SHARE

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्ट्यामुळे येणाऱ्या वादळाचं चक्रीवादळात रूपांतर झालं आहे. निसर्ग असं या चक्रिवादळाचं नाव आहे. आता हे चक्रिवादळ महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असल्यानं प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील सर्व बातम्या पाहा मुंबई लाइव्हच्या लाइव्ह अपडेटमध्ये....

LIVE UPDATES

04:04 PM, Jun 03 IST
मुंबईपासून निसर्ग चक्रीवादळ ७५ किलोमीटर अंतरावर
04:01 PM, Jun 03 IST
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

03:49 PM, Jun 03 IST
वाळकेश्वर इथल्या एका इमारतीच्या टेरेसवरील छत उडाले...


03:31 PM, Jun 03 IST
पुढचे ६ तास मुंबईकरांसाठी महत्वाचे - महापालिका आयुक्त
03:19 PM, Jun 03 IST
निसर्ग चक्रीवादळ पार्श्वभूमीवर ४० हजार नागरिकांना केलं स्थलांतरीत
03:12 PM, Jun 03 IST
अंधेरी पूर्व परिसरात कोसळलं झाड


03:08 PM, Jun 03 IST
मुंबई विमानतळ संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बंद

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport witnessed a runway excursion today with FedEx flight 5033 arriving from Bengaluru. The incident occurred when the MD11 aircraft landed on runway 14/32. The aircraft was towed away from the runway and there has been no disruption in flight operations.

03:05 PM, Jun 03 IST
मरोळ परिसरात कोसळलं झाड


02:31 PM, Jun 03 IST
नरिमन पॉइंट परिसरात कोसळलं झाड
02:23 PM, Jun 03 IST
महापालिकेनं माहीम कॉजवेच्या बाजूला असणाऱ्या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना जवळील महापालिका शाळांमध्ये स्थलांतरित केले आहे.
02:17 PM, Jun 03 IST
निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता , नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बांद्रा-वरळी सीलिंक वरून कुठल्याही प्रकारची वाहतूक करण्यास बंदी घालण्यात येत आहे.
02:16 PM, Jun 03 IST
मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवरील वाहतुकीला बंदी

निसर्ग चक्रीवादळामुळे वरळी सी लिंक वरील वाहतूकिला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही या मार्गाने प्रवास करू नये, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे ट्वीटद्वारे आवाहन

02:13 PM, Jun 03 IST
दहिसर गणपत पार्ली परिसर खाली करण्यात आला, नननागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं
02:12 PM, Jun 03 IST
समुद्रकिनारी सुरक्षेच अंतरासाठी ठेवण्यात आलेले खांब पडले


02:11 PM, Jun 03 IST
मुंबई सेंट्रल परिसरात वादळाचा फटका, कोसळले झाड


02:01 PM, Jun 03 IST
मुंबईच्या विधानभवन परिसरात झाडं कोसळली
02:00 PM, Jun 03 IST
निसर्ग चक्रीवादळ उरणच्या दिशेनं अग्रेसर
02:00 PM, Jun 03 IST
मुंबईत जोरदार पाऊस, दादर चौपाटी


01:59 PM, Jun 03 IST
निसर्ग चक्रीवादळ उरण आणि धुळ्याच्या दिशेनं पुढे सरकत आहे
12:33 PM, Jun 03 IST
अतिसंवेदनशील ठिकाणी तसेच रुग्णालयांमध्ये वीजेसाठी जनित्र (जनरेटर) उपलब्ध करण्याचे आदेश
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा