Advertisement

महाराष्ट्राचा 'महा'अर्थसंकल्प

SHARE

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करताहेत. या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतूदी पुढीलप्रमाणे.

LIVE UPDATES

01:16 PM, Mar 06 IST
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची निराशा, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचा सरकारला विसर, कोकणाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम - देवेंद्र फडणवीस
01:13 PM, Mar 06 IST
हा अर्थसंकल्प नाही तर जाहीर सभेतलं भाषण - देवेंद्र फडणवीस
12:40 PM, Mar 06 IST
सत्तेत आल्यानंतर आम्ही केवळ योजनांची घोषणा केली नाही, तर त्याची अंमलबजावणीही सुरू केली- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
12:16 PM, Mar 06 IST
२ लाखांवरील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना आणि नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील ५० हजार रुपयांची प्रोत्साहनपर तरतूद - अजित पवार
12:15 PM, Mar 06 IST
शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी तरतूद करायची होती - अजित पवार
12:15 PM, Mar 06 IST
कोरोना व्हायरसमुळे मंदीचं सावट, सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळलं - अजित पवार
12:14 PM, Mar 06 IST
अर्थसंकल्प सादर करण्यासाठी कसरत करावी लागली- अजित पवार
12:12 PM, Mar 06 IST
पुणे मेट्रोसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार - अजित पवार
12:11 PM, Mar 06 IST
मराठवाडा वॉटर ग्रीड योजना सुरु राहणार, पाणीपुरवठा विभागासाठी 2043 कोटी - अजित पवार
12:11 PM, Mar 06 IST
1074 ग्रामपंचायतींसाठी एक हजार कोटींचा निधी, 2024 पर्यंत नवीन कार्यालयीन इमारती - अजित पवार
12:10 PM, Mar 06 IST
राज्यात पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर १ रुपयांचा कर लावणार - अजित पवार
12:10 PM, Mar 06 IST
बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मोठी घोषणा
Advertisement
12:09 PM, Mar 06 IST
नवीन एम्ब्युलन्स करीता २५ कोटींची तरतूद - अजित पवार
12:09 PM, Mar 06 IST
मुंबई, पुण्यात मुद्रांक शुल्कात १ टक्के सुट देण्याची तरतुद
12:09 PM, Mar 06 IST
औद्योगिक वापरातील वीज दरात होणार कपात - अजित पवार
12:08 PM, Mar 06 IST
तृतीयपंथीयांच्या स्वतंत्र मंडळासाठी 5 कोटी
12:06 PM, Mar 06 IST
बालेवाडीत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, कबड्डी, कुस्ती, खो खो, व्हॉलिबॉल स्पर्धांचं आयोजन, प्रत्येक खेळासाठी 75 लाखांचं अनुदान - अजित पवार
12:06 PM, Mar 06 IST
प्राथमिक आरोग्यासाठी 5 हजार कोटीची तरतूद - अजित पवार

मेडिकल डीग्रीच्या 118 जागा वाढवणार

नव्या रुग्णवाहिकांसाठी 25 कोटी

20 डायलिसीस केंद्रे उभारणार

996 प्रकारचे उपचार मोफत होणार, गुडघा पुर्नरोपणाचाही समावेश


Advertisement
12:05 PM, Mar 06 IST
सामाजिक न्यायविभागासाठी ९६६८ कोटींची तरतुद
12:05 PM, Mar 06 IST
ठाण्यातील मुंब्रा कळवा इथं हज हाऊस प्रस्तावित
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा