Advertisement

केंद्रीय अर्थसंकल्प २०१९

SHARE

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मोदी सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या काय-काय घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LIVE UPDATES

01:36 PM, Jul 05 IST
आयकर स्लॅब जैसे थे, ५ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
01:15 PM, Jul 05 IST
२ कोटी रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील आयकरात बदल नाही.

२ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर ३ टक्के सरचार्ज तर ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर ७ टक्के सरचार्ज लागणार 



01:11 PM, Jul 05 IST
आयात इलेक्ट्राॅनिक वस्तूंवरील कर वाढवला
01:09 PM, Jul 05 IST
सोन्यावरील कस्टम ड्युटीत वाढ, १० टक्क्यांवरून १२.५ टक्के केला.
01:08 PM, Jul 05 IST
पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर १ रुपयाची वाढ
01:06 PM, Jul 05 IST
४५ लाखांपर्यंत घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दीड लाखाची अतिरिक्त सूट
01:05 PM, Jul 05 IST
श्रीमंतांसाठी कर वाढवला, ३ ते ७ टक्के अधिक कर द्यावा लागणार
01:00 PM, Jul 05 IST
लहान उद्योजकांना ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही, २ ते ५ कोटी उत्पन्नावर ३ टक्के सरचार्ज, ५ कोटींच्या पुढे ७ टक्के सरचार्ज
12:58 PM, Jul 05 IST
प्रत्यक्ष करात ७८ टक्के वाढ
12:57 PM, Jul 05 IST
वर्षाला बँक खात्यातून १ कोटींच्या वर रक्कम काढली तर २ टक्के कर द्यावा लागणार
12:57 PM, Jul 05 IST
इनकम टॅक्ससाठी पॅनऐवजी आधारही वापरता येणार
12:56 PM, Jul 05 IST
गृहकर्जाच्या व्याजावर साडेतीन लाखांची सुट, सध्या ही सूट ३ लाखांपर्यंत आहे.
Advertisement
12:50 PM, Jul 05 IST
४०० कोटी रुपये टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना कंपनी करात २५ टक्के सूट
12:48 PM, Jul 05 IST
सरकार नवीन शैक्षणिक धोरण आणणार, जागतिक दर्जाच्या संस्थांसाठी ४०० कोटींची तरतूद
12:47 PM, Jul 05 IST
इलेक्ट्रिक कार घेणाऱ्यांना करात अतिरिक्त दीड लाख रुपयांची सुट मिळणार
12:44 PM, Jul 05 IST
१८ देशांमध्ये भारतीय दुतावास सुरू करणार
12:35 PM, Jul 05 IST
२० रुपयांची नाणी बाजारात येणार
12:28 PM, Jul 05 IST
बँकांचा एनपीए १ लाख कोटी रुपयांनी घटला - सीतारमन
Advertisement
12:24 PM, Jul 05 IST
सरकारी बँकांना ७० हजार कोटी रुपये देणार
12:20 PM, Jul 05 IST
महिलांच्या विकासासाठी केंद्राच्या अनेक योजना

महिला केंद्रीत बनविण्याचा प्रयत्न, या लोकसभेत ७८ महिला खासदार विक्रम

Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा