Advertisement

केंद्रीय अर्थसंकल्प २०१९

SHARE

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मोदी सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या काय-काय घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LIVE UPDATES

12:19 PM, Jul 05 IST
अनिवासी भारतियांना आधार कार्ड देणार
12:11 PM, Jul 05 IST
उजाला योजनेतून केंद्र सरकारचं पाऊल

उजाला योजनेअंतर्गत ३५ कोटी एलईडी बल्ब वाटले गेले.

12:09 PM, Jul 05 IST
स्टार्ट अप इंडियासाठी टीव्ही चॅनेल काढणार
12:03 PM, Jul 05 IST
भारताला उच्च शिक्षणाचं केंद्र बनविण्याचा प्रयत्न

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न, उच्च शिक्षणासाठी ४०० कोटींचा निधी

12:00 PM, Jul 05 IST
ग्रामसडक योजनेसाठी ८० हजार कोटींची तरतूद
12:00 PM, Jul 05 IST
५.६ लाख गावं हगणदारी मुक्त करण्यात आली आहेत.
11:59 AM, Jul 05 IST
८१ लाख शहरी घरांना मंजुरी
11:59 AM, Jul 05 IST
मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी पीपीपी मॉडेल राबवणार
11:58 AM, Jul 05 IST
स्वच्छ भारत योजना प्रत्येक गावात नेणार
11:56 AM, Jul 05 IST
पंतप्रधान ग्राम सडक योजनेत १,२५ हजार किमीचे रस्ते तयार करणार
11:55 AM, Jul 05 IST
अर्थसंकल्पीय भाषण चालू असताना सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला
11:51 AM, Jul 05 IST
२०२४ पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोहोचवणार
Advertisement
11:48 AM, Jul 05 IST
जीएसटी नोंदणीकृत लघु-मध्यम उद्योगांना २ टक्के व्याजदराने भांडवल देणार
11:48 AM, Jul 05 IST
मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी पायभूत सुविधांवर भर देणार
11:41 AM, Jul 05 IST
२०२२ पर्यंत गरिबांना १.९५ कोटी घरं देणार
11:40 AM, Jul 05 IST
२०२२ पर्यंत प्रत्येक गावात वीजपुरवठा करण्यात येणार
11:40 AM, Jul 05 IST
सामाजिक संस्थांसाठी नवीन शेअर बाजार सुरू करणार
11:39 AM, Jul 05 IST
रेल्वे रूळ बांधण्यासाठी पीपीपी मॉडेलला मंजुरी
Advertisement
11:38 AM, Jul 05 IST
विमा क्षेत्रात १०० टक्के थेट परकीय गुंतवणूकीला (एफडीआय) मंजुरी
11:37 AM, Jul 05 IST
७ कोटी लोकांना गॅस कनेक्शन दिलं
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा