Advertisement

IPL 2022 Live Updates

SHARE

आयपीएलच्या १५व्या हंगामाच्या आधी मेगा लिलाव होणार आहे. २०२२ साली होणाऱ्या आयपीएलमध्ये ८ ऐवजी १० संघ असणार आहे. यासंदर्भात बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.

LIVE UPDATES

04:48 PM, Feb 25 IST
मुंबई इंडियन्स संघ
 • रोहित शर्मा (16 कोटी
 • जसप्रीत बुमरा (12 कोटी)
 • सूर्यकुमार यादव (8 कोटी)
 • कायरन पोलार्ड (6 कोटी)
 • ईशान किशन (15.25 कोटी)
 • डेवाल्ड ब्रेविस (3 कोटी)
 • बसिल थम्पी (30 लाख)
 • मुरुगन आश्विन (1.6 कोटी)
 • जयदेव उनाडकट (1.30 कोटी)
 • मयांक मार्कंडे (65 लाख)
 • तिलक वर्मा (1.70 कोटी)
 • संजय यादव (50 लाख)
 • जोफ्रा आर्चर (8 कोटी)
 • डॅनियल सॅम्स (2.60 कोटी)
 • टिमल मिल्स (1.5 कोटी)
 • टीम डेव्हिड (8.25 कोटी)
 • रिले मरेडिथ (1 कोटी)
 • मोहम्मद अर्शद खान (20 लाख)
 • अर्जून तेंडुलकर (30 लाख)  
04:47 PM, Feb 25 IST
मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सुर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना रिटेन केले आहे. तर इशान किशन याला 15 कोटी रुपये मोजून पुन्हा एकदा आपल्या संघात घेतले आहे. मेगा लिलावात मुंबईने अनेक खेळाडूंवर बोली लावल्या आहेत.
04:47 PM, Feb 25 IST
यंदाची आयपीएल स्पर्धा 2 ग्रुपमध्ये होणार

ग्रुप अ 

 • मुंबई
 • कोलकाता 
 • राजस्थान
 • दिल्ली
 • लखनौ


ग्रुप ब 

 • चेन्नई
 • हैदराबाद
 • बंगळुरु
 • पंजाब
 • गुजरात
04:46 PM, Feb 25 IST
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत बरेच बदल पाहायला मिळणार आहेत.
04:46 PM, Feb 25 IST
मुंबई इंडियन्स संघाची कमान रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. पण मेगा लिलावामुळे संघात अनेक बदल झाले आहेत.
04:46 PM, Feb 25 IST
लीग स्पर्धेत प्रत्येक सघाचे 14 सामने होणार आहेत. लीग स्पर्धेतून चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
04:46 PM, Feb 25 IST
लीग स्पर्धेत मुंबईचे प्रत्येकी दोन सामने

लीग स्पर्धेत मुंबईचे प्रत्येकी दोन सामने कोलकाता, राजस्थान, दिल्ली, लखनौ आणि चेन्नई या संघाविरोधात  होणार आहेत. तर हैदराबाद, आरसीबी, पंजाब आणि गुजरात यांच्याविरोधात एक एक सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट करत स्पर्धेत आपले सामने कुणाबरोबर होणार आहेत, याची माहिती दिली आहे.

04:46 PM, Feb 25 IST
मुंबई इंडियन्स अ ग्रुपमध्ये आहे. मुंबई इंडियन्स संघाने ट्विट करत आपले सामने कुणाबरोबर होणार आहेत, याची माहिती दिली आहे.
04:44 PM, Feb 25 IST
प्रत्येक संघाचे 14 सामने होणार आहेत.
04:44 PM, Feb 25 IST
10 संघांना 2 ग्रुपमध्ये विभागण्यात येणार आहे.
04:44 PM, Feb 25 IST
यंदा स्पर्धा 2 टप्प्यात खेळवण्यात येणार आहे.
04:44 PM, Feb 25 IST
2 संघ वाढल्यामुळे यंदापासून आयपीएलमध्ये 10 संघामध्ये रणसंग्राम होणार आहे.
Advertisement
04:44 PM, Feb 25 IST
29 मे रोजी अंतिम सामना होणार आहे.
04:43 PM, Feb 25 IST
26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे.
12:22 PM, Feb 10 IST
अहमदाबाद संघाने आपले नाव जाहीर केले

इंडियन प्रीमियर लीगची नवीन फ्रेंचायझी अहमदाबाद संघाने आपले नाव जाहीर केले आहे. अहमदाबाद फ्रेंचायझी आयपीएलच्या १५व्या हंगामात ‘गुजरात टायटन्स’ या नावाने मैदानात उतरणार आहे. आज बुधवारी ही घोषणा करण्यात आली. याआधी हा संघ अहमदाबाद टायटन्स नावाने ओळखला जाणार, असे वृत्त आले होते.

12:17 PM, Feb 10 IST
संघांकडे किती पैसे शिल्लक आहेत?
 • चेन्नई सुपर किंग्ज – ४८ कोटी रुपये
 • मुंबई इंडियन्स – ४८ कोटी रुपये
 • कोलकाता नाइट रायडर्स – ४८ कोटी रुपये
 • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ५७ कोटी रुपये
 • पंजाब किंग्ज – ७२ कोटी
 • दिल्ली कॅपिटल्स – ४७.५० कोटी रुपये
 • राजस्थान रॉयल्स – ६२ कोटी
 • सनरायझर्स हैदराबाद – ६८ कोटी रुपये
12:16 PM, Feb 10 IST
आयपीएल २०२२ रिटेन्शन पॉलिसी
 • एकूण खेळाडूंची पर्स – ९० कोटी.
 • ४ खेळाडूंना कायम ठेवल्यास खेळाडूंच्या पर्समधून ४२ कोटी रुपये कापले जातील.
 • ३ खेळाडूंना रिटेन केल्याने ३३ कोटींची कपात होईल.
 • दोन खेळाडूंना कायम ठेवल्यास पर्समधून २४ कोटी रुपये कापले जातील.
 • त्याचबरोबर एका खेळाडूसाठी पर्समधून १४ कोटी रुपये कापले जातील.
 • बीसीसीआयच्या रिटेन्शन नियमांनुसार, ज्या खेळाडूला फ्रेंचायझी पहिल्या पसंतीवर कायम ठेवेल, त्याला १६ कोटी रुपये द्यावे लागतील. 
 • दुसऱ्या खेळाडूसाठी १२ कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत. 
 • तिसऱ्या खेळाडूला ८ कोटी तर चौथ्या खेळाडूला ६ कोटी रुपये दिले जातील.
12:15 PM, Feb 10 IST
बीसीसीआयने ५९० खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, यामध्ये ३७० भारतीय तर २२० परदेशी खेळाडू आहेत.
Advertisement
12:15 PM, Feb 10 IST
स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर मेगा लिलाव पाहता येणार आहे.
12:15 PM, Feb 10 IST
लिलावाचे वेळापत्रक भारतीय वेळेनुसार दोन्ही दिवशी सकाळी ११ वाजता सुरू होईल.
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा