Advertisement

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२२ : लाइव्ह अपडेट्स

SHARE

राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प (Maharashtra State Budget 2022-23) ११ मार्च रोजी मांडला जाणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार शुक्रवारी विधानभवनात राज्याच्या २०२२-२३ सालचा अर्थसंकल्प सादर करतील.

LIVE UPDATES

03:15 PM, Mar 11 IST
गेट वे ऑफ इंडियावर महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारी फिल्म
03:07 PM, Mar 11 IST
प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचं गाव उभारणार
02:59 PM, Mar 11 IST
आदिवासी विकास विभागासाठी 11 हजार 199 कोटी
02:55 PM, Mar 11 IST
शिर्डी विमानतळासाठी १५०० कोटी

गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारणी

जलमार्गासाठी ३३० कोटी रुपये

02:54 PM, Mar 11 IST
कोविड काळात विधवा झालेल्या महिलांच्या स्वयंरोजगारासाठी राज्य सरकार देणार प्रोत्साहन
02:54 PM, Mar 11 IST
शेतकऱ्यांना दिलासा, भूविकास बँकांचे ९६४ कोटी रुपयांचे कर्ज माफ
02:51 PM, Mar 11 IST
टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगड जिल्ह्यात खानापूरमध्ये जमीन
02:50 PM, Mar 11 IST
समृद्धी महामार्ग भंडारा गोंदिया आणि गडचिरोली पर्यंत विस्तार
02:49 PM, Mar 11 IST
पुणे शहरात ३०० एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार : अर्थमंत्री
02:47 PM, Mar 11 IST
एसटी महामंडळाला १ हजार नवीन बसेस देणार
02:46 PM, Mar 11 IST
८ कोटी रुपयांची ८ मोबाईल कर्करोग निदान वाहनं पुरवणार : अर्थमंत्री
02:45 PM, Mar 11 IST
सार्वजनिक बांधकाम विभागासाठी रस्ते विकासासाठी १५ हजार कोटी इमारत बांधणीसाठी १ हजार कोटी
Advertisement
02:45 PM, Mar 11 IST
मुंबई मनपातील रस्त्यांसाठी विशेष निधी
02:42 PM, Mar 11 IST
शालेय शिक्षण विभागाला २३५३ कोटी क्रीडा विभागाला ३८५ कोटी

महर्षी कर्वे, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी १ कोटी निधी

शाळांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा स्तरावर ५ टक्के निधी


02:41 PM, Mar 11 IST
तरुणांना विशेष संधी निर्माण करुन देण्यासाठी स्टार्ट अपसाठी भांडवल 100 कोटी रकमेचा शासनाचा स्टार्ट अप फंड उभारण्यात येणार
02:39 PM, Mar 11 IST
राज्यातल्या सर्व तृतीयपंथीना ओळखपत्र देण्यात येणार
02:39 PM, Mar 11 IST
सदृढ पशुधनासाठी ३ फिरत्या पशुशाळा उभारणार : अर्थमंत्री अजित पवार
02:38 PM, Mar 11 IST
मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला १० कोटी रुपयांचा निधी
Advertisement
02:37 PM, Mar 11 IST
राज्यातल्या महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांना १ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.
02:34 PM, Mar 11 IST
१ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचं लक्ष्य : अर्थमंत्री अजित पवार
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा