राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प (Maharashtra State Budget 2022-23) ११ मार्च रोजी मांडला जाणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार शुक्रवारी विधानभवनात राज्याच्या २०२२-२३ सालचा अर्थसंकल्प सादर करतील.
नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर येथे ट्रामा केअर युनिट स्थापण करणार
ग्रामीण भागातील किडनीच्या रुग्णांसाठी लेप्रोस्कॉपी मोफत करण्यात येणार
यासाठी १७ कोटी ६० लाख रुपये खर्च करणार
मोतिबिंदू उपचार पद्धती आधुनिकीकरण
कर्करोग उपचारासाठी ८ कोटी रुपये
अकोला येथे स्त्री रुग्णालयाची स्थापना करण्यात येणार
जालना येथे ३६५ खाटांचे मनोरुग्णालय स्थापन करण्यात येणार
ग्रामीण भागातील जनतेसाठी शिवआरोग्य योजना सुरु करण्यात येणार
प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालय पातळीवर याचा विस्तार करण्यात येणार
पीक कर्ज वाटपात वाढ झाली
व्याज सवलत योजनेअतंर्गत योजनेअंतर्ग
हे वर्ष महिला शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येईल
खरिप, रब्बी पणन हंगाम शेतमाल खरेदी अंतर्गत विक्रमी खरेदी
सोसायट्यांचं संगणकीकरण करून कोअर बँकिंगद्वारे जोडणार
पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाल ४०६ कोटी
राज्यात राबवण्यात येणाऱ्या विकासाची पंचसूत्री या कार्यक्रमासाठी ४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमानंतर राज्यातली गुंतवणूक वाढेल आणि एक ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल - अजित पवार
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार अनुदान देण्याचं घोषित केलं होतं पण आर्थिक अडचणीमुळे हे वाटप करण्यात आलं नव्हतं. पण ही वचनपूर्ती आता होत आहे. याचा फायदा २० लाख शेतकऱ्यांना होईल.
याकरीता २०२२-२३ मध्ये १०,००० कोटी खर्च अपेक्षित आहे.
भूविकास बँकेच्या ३४, ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार
संभाजीराजे महाराजांचं स्मारक हवेलीमध्ये उभारणार, २५० कोटींची घोषणा