
पावसासंदर्भातील सर्व अपडेट एकाच क्लिकवर
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान खात्याने मुंबईसह ठाणे, नाशिक, रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट दिला आहे. मुंबईत संध्याकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी समुद्रात मोठी भरती येणार असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वाहतुकीसाठी अंधेरी सबवे बंद
मुंबईत मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे, रस्ते मार्गासह हवाई वाहतुकीवरही झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर नऊ विमानांचे लँडिंग रद्द करण्यात आलं आहे.
मुंबईत मुसळधार पावसाचा जोर पुढील काही तास असाच राहणार आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेच्या डीआरएमने देखील ट्वीट करत खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यकता असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन प्रवाशांना केलं आहे.
मुंबई, ठाण्याला पावसाने झोडपलं असून याचा लोकल रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. माटुंगा, कुर्ला, दादर, ठाणे या रेल्वे स्थानकात ट्रॅकवर पाणी साचलं आहे. ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे उशिराने सुरू आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने आहे. तर हार्बर रेल्वे २० मिनिटं उशिराने धावत आहे.
Red Alert for Mumbai & Thane 🔴
— Aeraxia (@KingRishi2005) May 26, 2025
IMD has just announced RED ALERT for the city. Stay Indoors. #MumbaiRains#HeavyRain pic.twitter.com/rxrorcYfiK
🚨 Next high tide in Mumbai at 11:24 AM - 4.75 m
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) May 26, 2025
Many areas especially Dadar & Colaba are heavily waterlogged..⚠️
Stay safe, Mumbaikars
#MumbaiRains pic.twitter.com/Ohnq4ypIkI
