Advertisement

Mumbai Rains <br/> Live Updates

SHARE

हवामान खात्याने दिलेल्या संकेतानुसार मंगळवारी दुपारपासून मुंबईसहित महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील ६ तासांत धुवांधार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईतील पाऊस, लोकल ट्रेन सेवा, वाहतूककोंडी, पाणी तुंबण्यासंदर्भातील सर्व "लाइव्ह" अपडेट्स येथे मिळवा.।

LIVE UPDATES

03:42 AM, Oct 10 IST
शिवाजी पार्ककडे जाणारा रस्ता बंद
03:42 AM, Oct 10 IST
गणपतराव कदम मार्गावर ४ किमी गाड्यांच्या रांगा
03:42 AM, Oct 10 IST
वरळी ते लोअर परळदरम्यान प्रचंड वाहतूककोंडी
03:42 AM, Oct 10 IST
मध्य रेल्वे १५ मिनिटे, हार्बर २० आणि पश्चिम रेल्वे १० मिनिटे उशीरा
03:42 AM, Oct 10 IST
शिवसेना भवनजवळील हाॅटेल मनोहरपासून काही अंतरावर झाड कोसळले
03:42 AM, Oct 10 IST
वांद्र- खार पश्चिम भागात रात्री आठवाजेपर्यंत जयभारत सोसायटी तसेच मिलन सब वे वगळता अन्य कुठेही पाणी तुंबल्याची तक्रार नाही.
03:42 AM, Oct 10 IST
सायंकाळी ७ वाजेपर्यंतची पावसाची नोंद शहर : ५८.७४ मि.मी पश्चिम उपनगर : ९२.२१ मिमी पूर्व उपनगर : ६२. ४५ मि.मी
03:42 AM, Oct 10 IST
वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व भाग असलेल्या महापालिकेच्या एच-पूर्व विभागातील वाकोला, हंसभुग्रा मार्ग आणि खेरवाडी परिसरात काही प्रमाणात पाणी तुंबले आहे. हा भाग खाेलगट असल्यामुळे याठिकाणी पाणी तुंबते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी सर्व पंप सुरु करण्यात आल
03:42 AM, Oct 10 IST
अंधेरी सब वे पाण्याखाली
03:42 AM, Oct 10 IST
जुहूतील जेव्हीपीडी गुलमोहर परिसरात पाणी साचले
03:42 AM, Oct 10 IST
नवीन सरकार येतात नवीन आशावाद दाखवतात आणि माणसं मरत जातात
03:42 AM, Oct 10 IST
शीव भागातील चौक, गांधी मार्केट, तसेच शीव प्रतीक्षा नगर येथे पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असले तरी अद्यापही या भागात पाणी साचण्याच्या तक्रारी नसल्याचे सहायक आयुक्त एफ-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त केशव उबाळे यांनी मुंबई लाइव्हशी बोलतांना सांगितले.
03:42 AM, Oct 10 IST
मीलन सब वे

03:42 AM, Oct 10 IST
जे.बी.नगर, अंधेरी, पूर्व
03:42 AM, Oct 10 IST
जे. बी. नगरमध्ये साचलेलं पाणी


03:42 AM, Oct 10 IST
मुंबईसाठी पुढील १५ तास धोक्याचे पुढील १५ तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. बुधवारी सकाळपर्यंत मुंबईकरांसाठी हा पावसाचा धोका आहे.
03:42 AM, Oct 10 IST
दादर, पश्चिम

03:42 AM, Oct 10 IST
रस्त्यांवर बेस्ट बस, रिक्षाही धावू लागल्या
03:42 AM, Oct 10 IST
अंधेरी मेट्रो स्थानकाखालील पाण्याची पातळी

03:42 AM, Oct 10 IST
मुंबई विमानतळावरील धावपट्टीवरून घसरल्यानंतर स्पाइसजेट विमानाची चाके गाळात रुतली


‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा