Advertisement

Mumbai Rains <br/> Live Updates

SHARE

हवामान खात्याने दिलेल्या संकेतानुसार मंगळवारी दुपारपासून मुंबईसहित महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील ६ तासांत धुवांधार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईतील पाऊस, लोकल ट्रेन सेवा, वाहतूककोंडी, पाणी तुंबण्यासंदर्भातील सर्व "लाइव्ह" अपडेट्स येथे मिळवा.।

LIVE UPDATES

03:42 AM, Oct 10 IST
मुंबईतील बेस्ट बस सेवा सुरळीत. कुठेही पावसाच्या पाण्याअभावी बस मार्ग वळवण्यात आलेला नाही. सर्व बस सेवा सुरळीत असल्याची माहिती बेस्टच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.
03:42 AM, Oct 10 IST
मुंबई विमानतळावरील सर्व उड्डाणे १० वाजेपासून खोळंबली
03:42 AM, Oct 10 IST
बोरीवली पूर्व येथील डॉन बॉस्कोचा परिसरात काही प्रमाणात पाणी साचले आहे. परंतु याव्यतिरिक्त कुठेही पाणी तुंबण्याच्या तक्रारी नाही. मात्र, नाल्याच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबांनी पुढील १५ तास काळजी घेण्याचे आवाहन बोरीवलीच्या आर-मध्य विभागाचे सहायक आयुक्
03:42 AM, Oct 10 IST
मिलन सब- वे, खार सब- वे, मालाड सब- वे, बोरीवली सब -वे, दहिसर सब- वे, पोयसर सब- वे आदी ठिकाणी पाणी साचले असले तरी कुठेही वाहतूक वळवण्यात आलेली नाही. मिलन सब वे येथे पुलावरून वाहतूक वळवण्यात आली. सर्व सब वेच्या ठिकाणी पंप सुरु करण्यात आल्याची माहिती मह
03:42 AM, Oct 10 IST
रात्री आठ वाजेपर्यंत मुंबईतील विविध भागांमध्ये १८२ पंप चालू करण्यात आले. शहरात ४८ पंप, पूर्व उपनगर ५७ पंप आणि पश्चिम उपनगर ७७ पंप सुरु करण्यात आले होते. हिंदमाताजवळ वाहतूक सुरळीत.
03:42 AM, Oct 10 IST
आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस शहर : ६२.८२ मि.मी पूर्व उपनगरे : ६८.३४ मि.मी पश्चिम उपनगरे : १०४.९१ मि.मी
03:42 AM, Oct 10 IST
अंधेरी, जोगेश्वरीत जोरदार पाऊस
03:42 AM, Oct 10 IST
आवश्यकता भासल्यास या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधा


03:42 AM, Oct 10 IST
वांद्रे, खार, सांताक्रूझ परिसरात जोरदार पाऊस सुरूच
03:42 AM, Oct 10 IST
ओव्हन फ्रेश, दादर येथे एका चारचाकीवर झाड पडले


03:42 AM, Oct 10 IST
बहुतांश चाकरमान्यांनी घरी राहणेच पसंत केल्याने ट्रेन रिकाम्या आणि रस्त्यांवरही तुरळक वाहतूक
03:42 AM, Oct 10 IST
दादर रेल्वे स्थानक प्लॅटफाॅर्म क्र ६ आणि फूट ओव्हर ब्रिज येथील दिवे बंद


Advertisement
03:42 AM, Oct 10 IST
सायन रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅकवर पाणी, लोकल वाहतूक संथगतीने सुरू
03:42 AM, Oct 10 IST
विरारमध्ये जोरदार पाऊस सुरू
03:42 AM, Oct 10 IST
अंधेरी मेट्रो स्टेशनखाली साचलेले पाणी

03:42 AM, Oct 10 IST
कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका 'मुंबई लाइव्ह'चे आवाहन

03:42 AM, Oct 10 IST
लिंक रोड, मालाड पश्चिम, बेस्ट बसवर झाड कोसळले. कुणालाही दुखापत नाही
03:42 AM, Oct 10 IST
आरेत वाहतूककोंडी
Advertisement
03:42 AM, Oct 10 IST
स्पाइस जेटचे वाराणसी- मुंबई विमान धावपट्टीवरून घसरले - सर्व १८३ प्रवासी सुखरूप
03:42 AM, Oct 10 IST
मुंबई विमानतळावरील धावपट्टीवरून घसरल्यानंतर स्पाइसजेट विमानाची चाके गाळात रुतली


‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा