Advertisement

मुंबईतील पावसाचे Live Updates

SHARE

इथं मिळतील तुम्हाला मुंबईतील पावसाचे क्षणाक्षणाचे 'लाइव्ह अपडेट्स'. रस्ते वाहतूक असो किंवा लोकलची स्थिती, कुठे साचलंय पाणी, कुठे होतोय पाण्याचा निचरा, प्रशासन नेमकं काय करतंय, हवामानाच्या स्थितीपासून मुंबई शहर, उपनगरातील परिस्थितीपर्यंत सर्वकाही, एकाच पेजवर.

LIVE UPDATES

04:05 PM, Jul 10 IST
वडोदरा एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या २०० प्रवाशांची एनडीआरएफने केली सुटका

नालासोपारा स्थानकाजवळ अडकलेल्या वडोदरा एक्स्प्रेसमधील प्रवाशांना एनडीआरएफचा मदतीचा हात

04:03 PM, Jul 10 IST
२४ तासांमध्ये मुंबईत 'असा' पडला पाऊस
04:02 PM, Jul 10 IST
सीबीडी बेलापूरमध्ये ट्रकला अपघात


ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक थेट वीज पुरवठा सब स्टेशनवर जाऊन पडला.

03:59 PM, Jul 10 IST
दादर टी.टी. परिसरातलं पाणी ओसरलं

03:36 PM, Jul 10 IST
एनडीआरएफने नालासोपाऱ्यातील माणिकपूर इथं केली २३ जणांची सुटका

Male-4
Female-9
Child-10
Total = 23




03:10 PM, Jul 10 IST
उंबरगाव ते विरारदरम्यान १२ एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांच्या मदतीसाठी एनडीआरएफ रवाना

नालासोपारा रेल्वे स्थानकातील ट्रॅकवर पाणी साचल्याने या मार्गावरील रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. एक्स्प्रेस गाड्या जागीच थांबवल्याने प्रवासी आतच अडकले आहेत. या प्रवाशांना मदत करण्यासाठी एनडीआरएफची टीम रवाना झाली आहे. रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेलं पाणी, खाद्यपदार्थ आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवण्यात येत आहे. 

02:56 PM, Jul 10 IST
मुंबईतील वाहतुकीची सद्यस्थिती 'अशी'

दक्षिण मुंबई- पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरूळीत सुरू


'या' मार्गांवर धीम्या गतीने वाहतूक सुरू-

  • दादर टी.टी. कोतवाल उद्यान ते न.ची. केळकर मार्ग, सेनाभवनच्या दिशेने  
  • हिंदमाता जंक्शन, गांधी मार्केट, डाॅ. आंबेडकर मार्ग 
  •  सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, बीकेसी जंक्शन, रझा जंक्शन, 

 

02:46 PM, Jul 10 IST
दुपारपर्यंत जवळपास २० मार्गावरील ८६ बेस्ट गाड्यांचे मार्ग बदलले

02:44 PM, Jul 10 IST
नालासोपारातील भगरल पाडात १५० जण अडकले, लोकांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ दाखल
02:41 PM, Jul 10 IST
जयपूर-वांद्रे अरावली एक्स्प्रेस रद्द
02:37 PM, Jul 10 IST
भाजपाच्या पक्षप्रवक्त्यांचंही 'पाणी'पत

एरवी पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडताना कुणापुढंही हार न मानणाऱ्या भाजपाच्या पक्षप्रवक्त्यांचं मुंबईच्या पावसाने चांगलंच 'पाणी'पत केलं. राष्ट्रीय पक्षप्रवक्ते संबित पात्रा आणि केशव उपाध्ये यांची दादरमध्ये आयोजित पत्रकार परिषद झाल्यानंतर हातात बूट धरून त्यांनाही साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. 

 


02:27 PM, Jul 10 IST
पश्चिम रेल्वेच्या वसई सब स्टेशनमध्येही गुडघाभर पाणी, वीज पुरवठा खंडित
Advertisement
02:26 PM, Jul 10 IST
डहाणू रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना खाद्यपदार्थांचं वाटप


02:24 PM, Jul 10 IST
वसई, नालासोपारा परिसरातील वीजपुरवठा खंडित

सोमवार दि.०९ जुलै २०१८पासुन मुंबई व उपनगरीय परिसरात सुरू असलेला सतंतधार पाऊसामुळे, वसई-विरार भागाला विजपुरवठा करणाऱ्या 'महापारेषण वसई अति उच्च दाब केंद्रा'च्या नियंत्रण कक्षामध्ये पाणी शिरले  आहे. यामुळे  खबरदारीचा उपाय योजना म्हणून तसेच उपकरणाच्या सुरक्षेच्या हेतुने सदर उच्च दाब वीज केंद्राचा वीज पुरवठा सकाळी ०७.३०पासून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वसई गाव , वसई प., नालासाेपारा पु./प., आचोळे ,विरार प. ,जुचंद्र, नवघर पु., वालिव आगाशे, मनवेलपाडा, अनाळा , या भागातील विजपुरवठा खंडित आहे. यामुळे महावितरणचे सुमारे ३लाख ग्राहक प्रभावित झाले आहेत.

यातील काही भागाचा वीजपुरवठा हा अप्रिय घटना टाळण्यासाठी, सुरक्षेच्या कारणास्तव खंडित करण्यात आला आहे. महावितरण वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वसई-विरारच्या परिसिथतीवर सतत लक्ष ठेवुन आहे. परिस्थिती पूर्वपदावर येताच सुरक्षेचा आढावा घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल.

महावितरणचे ग्राहक गरजेनुसार 1912,  18001023435 व  18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण करत आहे.

विश्वजीत भोसले
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी(प्रभारी)
कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण.

01:50 PM, Jul 10 IST
दादर टी.टी. येथून पाण्यातून मार्ग काढताना...
01:44 PM, Jul 10 IST
ठाणे, घोडबंदर रोडवर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना बेस्टची बस
01:43 PM, Jul 10 IST
काशीमिरा इथं दुकानांत पाणी शिरून वस्तूंचं नुकसान
01:42 PM, Jul 10 IST
दादर टी.टी. इथं पाणी साचल्याने टिळक ब्रिजवर वाहनांच्या रांगा लागल्या



Advertisement
01:37 PM, Jul 10 IST
सायन परिसरात रेल्वे ट्रॅकवर साचलेलं पाणी



01:33 PM, Jul 10 IST
मध्य रेल्वेवरील पुण्याकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील एक्स्प्रेस रद्द
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा