Advertisement

निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण, 'अग्गबाई सासूबाई' मालिकेतील इतर कलाकार...

‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाली आहे.

निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण, 'अग्गबाई सासूबाई' मालिकेतील इतर कलाकार...
SHARES

छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सौम्य लक्षणं असून त्यांनी स्वतःला घरीच क्वारंटाइन केलं आहे.

मालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारे तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, डॉ. गिरीश ओक यांच्यासह इतर कलाकारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

योग्य ती खबरदारी घेत मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र तरीदेखील सेटवर कोरोनाचा शिरकाव होताना दिसतोय. यापूर्वी आई माझी काळूबाई या मालिकेच्या सेटवर तब्बल २२ जणांना कोरोनाची लागण झाली होती. याच मालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणा-या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान २२ सप्टेंबर रोजी त्यांचं निधन झालं.

याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इशारा देत कोविड सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यास निर्मात्यांना बजावलं होतं. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक पत्रक जारी केलं होतं.

या पत्रकात त्यांनी म्हटलं आहे की, टीव्ही मालिकेचं चित्रीकरण सुरू असताना ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्यासह २७ जणांना कोरोनाची लागण झाली. तरीही मालिकेचं चित्रीकरण सुरूच राहिलं. त्याचाच परिणाम म्हणून ८३ वर्षीय आशालता यांचं निधन झालं.

राज्यातील लाॅकडाऊनमुळे गेले अनेक महिने मालिका तसंच सिनेमाचं चित्रीकरण पूर्णपणे बंद होतं. मनोरंजनसृष्टीतील अनेक नामवंतांनी चित्रीकरणास सशर्त परवानगी मिळावी, अशी मागणी वारंवार केल्यामुळे अखेर राज्य सरकारने कोविड प्रोटोकाॅलचं पालन करून शुटिंग करण्याची अट निर्मात्यांना घातली होती.



हेही वाचा

दिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा