Advertisement

दिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब

अक्षयनं एक ट्वीट करत लक्ष्मी बॉम्बच्या रिलिज तारखेची घोषणा केली. सोबतच त्यानं एक टीझर देखील दिला आहे.

दिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब
SHARES

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आपल्या चित्रपटांमध्ये वेगळ्या प्रयोगांसाठी चर्चेत असतो. त्याच्या आगामी लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाची देखील सध्या चर्चा सुरू आहे. अक्षयनं एक ट्वीट करत लक्ष्मी बॉम्बच्या रिलिज तारखेची घोषणा केली. सोबतच त्यानं एक टीझर देखील दिला आहे.

अक्षय कुमारनं चित्रपटाच्या अपडेटसह एक टीझर देखील शेअर केला आहे. त्यात अक्षय साकारत असलेल्या रोलची एक प्रतिमा दिली आहे. OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या सात मोठ्या चित्रपटांपैकी एक मोठा चित्रपट म्हणून लक्ष्मी बॉम्बची घोषणा झाली होती.

ट्विटरवर पोस्ट शेअर करत अक्षयनं म्हटलं आहे की, या दिवाळीला तुमच्या घरी 'लक्ष्मी' सोबत धमाकेदार 'बॉम्ब ' देखील येणार आहे. हा सिनेमा आता दिवाळीत म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचं अक्षयनं म्हटलं आहे.

आयपीएलचा मौसम लक्षात घेऊन ओटीटीवर येणाऱ्या भुज, लक्ष्मी बॉम्ब यांसारख्या सिनेमांना फटका बसणार आहे. कारण आयपीएल ज्या ओटीटीनं घेतलाय त्याच ओटीटीवर हे सिनेमे येणार आहेत.

डिस्ने हॉटस्टारवर आयपीएल दाखवली जाणार आहे. १९ तारखेपासून IPL सुरू होणार आहे. १० नोव्हेंबरपर्यंत IPL असणार आहे. आयपीएलची भारतात आणि एकूणच जगभरात असलेली क्रेझ लक्षात घेऊन त्याच ओटीटीवर रिलीज होणारे सिनेमे काही काळासाठी थांबवले जातील.हेही वाचा

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन

अनुराग कश्यपला 'या' दोन बायकांनी दिला पाठिंबा

Read this story in हिंदी
संबंधित विषय