Advertisement

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन

'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन
SHARES

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. सातारा इथल्या फलटण तालुक्यात 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती बिघडल्यानंतर आशालता यांना १६ सप्टेंबर रोजी वाई इथल्या प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

आशालता वाबगावकर यांची ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होत होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर पहाटे ४.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वाबगावकर यांच्या निधनानं मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

साताऱ्याजवळ असलेल्या वाई जवळच्या हिंगोली या गावात एका फार्म हाऊसमध्ये या मालिकेचं शुटिंग सुरू होतं. आशालता या गेली काही दिवस या शुटिंगसाठी तिथेच होत्या. या मालिकेत एका गाण्याचं शुटिंग सुरू होतं. तिथे मुंबईवरून काही कलाकारांचा ग्रुप आला होता. त्याच वेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या सेटवर तब्बल २७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अलका कुबल या मालिकेत देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत अभिनेत्री आशालता वाबगावकर महत्त्वाची भूमिका साकारत होत्या.

आशालता वाबगांवकर यांचा जन्म ३१ मे १९४१ रोजी गोव्यात झाला. त्या मुळच्या गोव्याच्या असल्यानं त्यांनी कोंकणी आणि मराठी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आशालता वाबगांवकर यांनी आतापर्यंत जवळपास १०० हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं आहे. अपने पराये या हिंदी चित्रपटातून त्यांनी सिने सृष्टीत पदार्पण केलं.

गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, चिना, मोहनंदा यासारख्या अनेक नाटकात त्यांनी काम केलं आहे. तसंच उंबरठा, सुत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होते.हेही वाचा

अनुराग कश्यपला 'या' दोन बायकांनी दिला पाठिंबा

राम गोपाल वर्मांनी केली स्वत:च्या बायोपिकची घोषणा, चित्रपट ठरणार वादग्रस्त?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement