Advertisement

आणि ऋतिकने 'स्माइल प्लीज' म्हणत दिला क्लॅप

तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता ऋतिक रोशन सध्या 'सुपर ३०' या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याने 'स्माइल प्लीज' या मराठी सिनेमाला क्लॅप देत मुहूर्त केला.

आणि ऋतिकने 'स्माइल प्लीज' म्हणत दिला क्लॅप
SHARES

तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला अभिनेता ऋतिक रोशन सध्या 'सुपर ३०' या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याने 'स्माइल प्लीज' या मराठी सिनेमाला क्लॅप देत मुहूर्त केला. 

फॅशन डिझाइनर आणि दिग्दर्शक विक्रम फडणीस 'हृदयांतर' या पदार्पणाच्या सिनेमानंतर आपल्या आगामी मराठी सिनेमाकडे वळला आहे. सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'हृदयांतर'ने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं होतं. त्यानंतर 'स्माईल प्लीज' हा विक्रमचा दुसरा सिनेमा आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच ऋतिक रोशनच्या हस्ते करण्यात आला.


टीमला शुभेच्छा

या सोहळ्याला ऋतिकसोबतच अमिषा पटेल, झरीन खान, रॉनीत रॉय, किआरा अडवाणी, श्वेता बच्चन- नंदा अशा बॉलीवूडमधील आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थित राहून विक्रम फडणीस आणि 'स्माईल प्लीज' चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर या कलाकारांनी यावेळी चित्रपटातील आपापल्या व्यक्तिरेखांची ओळख करून दिली.


भावनिकता आणि व्यावहारिकता

मुहूर्तानंतर बोलताना ऋतिक म्हणला की, विक्रमचं काम मला माहित आहे. तो एक उत्तम दिग्दर्शक आहे. स्वतःला कामात पूर्णपणे झोकून देण्याची त्याची जी सवय आहे, ती अफलातून आहे. कोणतीही गोष्ट त्याच्या डोक्यात स्पष्ट असल्यामुळेच तो, ती उत्तमरित्या साकारू शकतो. विक्रमच्या 'हृदयांतर' या चित्रपटात मी छोटीशी भूमिका साकारली होती. त्यामुळं तो सर्वांना कशा प्रकारे सामावून घेतो, याची मला कल्पना आहे. भावनिकता आणि व्यावहारिकता याचा सुंदर मेळ त्याच्या चित्रपटात अनुभवायला मिळतो. विक्रमचा 'स्माईल प्लीज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य फुलवेल.


कथेत आईचा भास

'स्माईल प्लीज' या आपल्या दुसऱ्या सिनेमाविषयी विक्रम म्हणाला की, हा चित्रपट माझ्यासाठी खूप विशेष आहे. मूळात या कथेत मला कुठेतरी माझ्या आईचा भास होतो आणि म्हणूनच तो माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे. हा चित्रपट करण्याचे ज्यावेळी मी ठरवलं त्यावेळी माझ्या निकटवर्तीयांनी मला खूप मदत केली. अजूनही करत आहेत. आज त्यानिमित्तानं मी त्यांचेही आभार मानतो. मला आशा आहे की, या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांच्या मनातील 'स्माईल प्लीज'ची फ्रेम नक्कीच बहरेल.


रोहन- रोहनचं संगीत

'स्माईल प्लीज' या चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट आयुष्याकडे पाहण्याचा आणि आयुष्य आनंदाने जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देणारा असावा. 'हृदयांतर'नंतर या चित्रपटाच्या निमित्तानं विक्रम आणि मुक्ता पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यामुळं या चित्रपटातही रसिकांना काहीतरी वैविध्यपूर्ण पाहायला मिळणार हे नक्की. हॅशटॅग फिल्म स्टुडिओच्या निशा शाह आणि क्रित्यावत प्रॉडक्शनच्या सानिका गांधी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 'स्माईल प्लीज' या चित्रपटाला रोहन- रोहन या जोडीचं संगीत लाभणार असून मंदार चोळकर चित्रपटातील गाण्यांना शब्दबद्ध करणार आहेत.



हेही वाचा -

छोट्या पडद्यावर अवतरणार 'मोलकरीण बाई'

‘मर्द को दर्द नहीं होता’ची धमाल पोस्टर्स




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा