Advertisement

प्रभासकडून 'सरसेनापती हंबीरराव' मराठी चित्रपटाच्या टीझरचं कौतुक

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

प्रभासकडून 'सरसेनापती हंबीरराव' मराठी चित्रपटाच्या टीझरचं कौतुक
SHARES

मराठी अभिनेते प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका असलेला आणि त्यांचेच दिग्दर्शन असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आता या टीझरला बाहुबली फेम अभिनेता प्रभासकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. प्रभासनं ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या टीझरचे कौतुक करत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.


प्रभासनं त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले, ‘मला टीझर खूप आवडला! मराठीतील आत्तापर्यंतच्या सर्वात भव्य अशा ऐतिहासिक चित्रपटाला माझ्या खूप शुभेच्छा. #SarsenapatiHambirrao प्रवीण विठ्ठल तरडे’

प्रवीण तरडे यांनी देखील या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोस्ट लिहित म्हटलं की, ‘केलेल्या कामाचं चीज झालं.. आज सरसेनापती हंबीररावच्या टीझरचं कौतुक बाहुबली प्रभासनं केलं.. परवा जवळचे मित्र सुबोध भावे, संजय जाधव, विजु माने, अमित भंडारी, अमेय खोपकर यांनीही केल होतं.. मित्रांनो तुमचेही खुप आभार असेच पाठीशी राहा.. आज प्रभासनं दिलेल्या शुभेच्छा पुढच्या प्रवासात महत्वाच्या ठरतील..’

प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये अभिनेता गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.हेही वाचा

'मुंबईत राहूनही मराठी येत नाही', कपिल शर्माला सोनालीनं सुनावलं

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा