Advertisement

हे दोघं पुन्हा दिसणार बाप-लेकाच्या भूमिकेत


हे दोघं पुन्हा दिसणार बाप-लेकाच्या भूमिकेत
SHARES

सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी या दोन अभिनेत्यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीबरोबरच ऑफस्क्रीन केमिस्ट्री कशी आहे हे अनेकांना माहीत आहे. या ऑफस्क्रीन बाप लेकाच्या जोडीवर प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम केलं. या दोघांनीही साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. आज तब्बल १० वर्षांनंतर ही जोडी पुन्हा आपल्याला एकत्र दिसणार आहे.


पिता पुत्राची ऑनस्क्रिन जोडी

२००८ मध्ये आम्ही सातपुते या चित्रपटातून ही जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांसमोर आली होती. 'मुंबई लाईव्ह'ला दिलेल्या खास मुलाखतीत या दोघांनीही आपल्या बाप मुलाच्या नात्याबद्दल अनेक किस्सेही सांगितले. आता हीच जोडी लवकरच पिता-पुत्राच्या भूमिकेत दिसेल.

या चित्रपटाचं नाव काय? याची कथा काय? या चित्रपटात कोणकोणते कलाकार आहेत? ही माहिती मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

सचिन पिळगावकर यांच्या आजपर्यंतच्या प्रत्येक कामावर त्यांच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. त्यांचे दिग्दर्शन आणि अभिनय असेलेले अनेक चित्रपट आजही प्रेक्षक पुन्हा पुन्हा बघत असतात. अशीही बनवाबनवी, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत, नवरा माझा नवसाचा हे चित्रपट आजही प्रेक्षकांना पोट धरून हसवतात. त्यामुळे आता पुन्हा आपल्या लाडक्या सचिनला मोठ्या पडद्यावर बघणे ही चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा