Advertisement

सागर देशमुख घडवणार भाईंचं दर्शन!

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटात पुलं त्यांच्या खऱ्या खुऱ्या रूपात भेटणार आहेत. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मराठी रंगभूमीवर नेहमीच विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख या चित्रपटात पुलंच्या रूपात भेटणार आहे.

सागर देशमुख घडवणार भाईंचं दर्शन!
SHARES

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अशी ख्याती असलेले पु. ल. देशपांडे लवकरच रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत. ‘भाई - व्यक्ती की वल्ली’ या आगामी चित्रपटात सागर देशमुखने साकारलेल्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुलं भेटणार आहेत.


महाराष्ट्राचं भूषण

व्यक्तिचित्रण किती खुसखुशीत असू शकतं, कथेतील प्रत्येक पात्र वाचकाला भुरळ घालू शकतं हे ज्यांच्या लेखनशैलीतून उमगतं, लिखाणाची शैली अशी अतरंगी की त्या व्यक्तीच्या प्रेमात माणूस पडतो, हास्य आणि व्यंग यांचा अलौकिक ताळमेळ घडवणारी ही व्यक्ती म्हणजे लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक, दिग्दर्शक आणि अभिनेते पु.ल. देशपांडे उर्फ भाई. खऱ्या अर्थाने अष्टपैलू जीवन जगले पुलं खरोखर महाराष्ट्राचं भूषण होते. ज्यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटकं आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले, पण आता खुद्द त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


मोठं आव्हान

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटात पुलं त्यांच्या खऱ्या खुऱ्या रूपात भेटणार आहेत. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मराठी रंगभूमीवर नेहमीच विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख या चित्रपटात पुलंच्या रूपात भेटणार आहे. खरंतर पुलं साकारण्याचं आव्हान यापूर्वी बऱ्याच कलाकारांनी स्वीकारलं असलं तरी सागरने साकारलेले भाई पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. त्यामागे कारणंही तशीच आहेत.


टीझर लाँच

मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची पटकथा गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परबचं आहे. या चित्रपटामध्ये इरावती हर्षे हिने सुनीता बाईंची भूमिका साकारली आहे . तसेच टीझर लाँच सोहळ्याला मराठी एंटरटेनमेंट वायाकॉम १८ चे व्यवसाय प्रमुखनिखिल साने, महेश मांजरेकर, सागर देशमुख, इरावती हर्षे, दलिप ताहिल, शिवाजी साटम, सचिन खेडेकर, सुनील बर्वे, अभिजित देशपांडे, पूजा सावंत, अंकुश चौधरी, प्रिया बापट इत्यादी कलाकार हजर होते.



हेही वाचा-

२८ वर्षांनी पुन्हा मराठीकडे वळले बप्पीदा

झीरोच्या अडचणीत वाढ, चित्रपटाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा