Advertisement

क्रिकेटवेड्या तरुणाईचं भावविश्व मांडणारा 'मी पण सचिन'


क्रिकेटवेड्या तरुणाईचं भावविश्व मांडणारा 'मी पण सचिन'
SHARES

सचिन....हे नाव घेतलं की, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा देव समजला जाणार सचिन तेंडुलकर! क्रिकेट खेळाला धर्म मानणाऱ्या भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. भारताच्या प्रत्येक गल्ली-बोळ्यात आपल्याला असे अनेक महत्वाकांक्षी सचिन दिसून येतील. अशा या सर्व होतकरू तरुणांचं नेतृत्व करणारा सिनेमा लवकरच मराठीच्या मोठ्या पडद्यावर येत आहे.


सोशल नेट्वर्किंग साईटवर मुहूर्त

'मी पण सचिन' असं या सिनेमाचं नाव असून, या सिनेमाला सोशल नेट्वर्किंग साईटवर फर्स्ट लूकसह मुहूर्त मिळाला. गणराज असोसिएटसने आतापर्यंत प्रस्तुत आणि निर्मित केलेल्या हिट चित्रपटांच्या यादीत 'मी पण सचिन' या चित्रपटाचा देखील समावेश होत आहे. विशेष म्हणजे, मराठी रॅपर किंग जेडी उर्फ श्रेयश जाधव या सिनेमाच्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका निभावत आहे.


काय आहे स्वप्नीलची भूमिका?

या सिनेमात मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी झळकणार असून, सिनेमाच्या फर्स्ट लुकमध्येदेखील तो दिसून येतो. हा सिनेमा भविष्यात सचिन होऊ इच्छिणाऱ्या एका महत्वाकांक्षी क्रिकेटपटूवर आधारित आहे का? असा प्रश्न पडतो. शिवाय स्वप्नील जोशीची यात नेमकी कोणती भूमिका आहे, हे देखील गुपित आहे. गणेश गीते आणि नीता जाधव यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाच्या चित्रीकरणाची पुणे येथे सुरुवात झाली असून, हा सिनेमा भारतातील क्रिकेटवेड्या तरुणाईंचे भावविश्व मांडणारा ठरेल अशी आशा आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा