Advertisement

आणि तेजश्रीचा लॅपटॉप गेला चोरीला!


आणि तेजश्रीचा लॅपटॉप गेला चोरीला!
SHARES

आपल्याजवळची एखादी महागडी वस्तू गहाळ होते तेव्हा आपण खूप अस्वस्थ होतो. खास करून आपला लॅपटॉप किंवा मोबाईल कुणी चोरला तर ! अगदी असंच काहीतरी घडलंय ते अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत. 'असेही एकदा व्हावे' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान ही घटना घडली आहे.


आणि लॅपटॉप सापडला

चित्रीकरणासाठी पुणे येथील डेक्कन रेन्देझ्वौस हॉटेलमध्ये असताना तेजश्रीच्या रूममधून अचानक तिचा लॅपटॉप गहाळ झाला होता. सर्वसामान्य व्यक्तीची जशी अवस्था होईल अगदी तशीच अवस्था तेजश्रीची झाली होती. लॅपटॉपची चौकशी करण्यासाठी तेजश्री तसेच 'असेही एकदा व्हावे'च्या टीमने त्यावेळी पूर्ण हॉटेल पालथे घातले. मात्र लॅपटॉपचा कुठेच काही पत्ता लागला नाही. त्यामुळे लॅपटॉप आता चोरीला गेला असून, पुन्हा तो मला कधीच मिळणार नाही, असं तेजश्रीने गृहीत धरले. मात्र, जसं नायिकेच्या मदतीला नायक धावून येतो, अगदी तसंच अभिनेता उमेश कामत तेजश्रीसाठी धावून आला. त्याने तिचा चोरीला गेलेला लॅपटॉप चक्क शोधून काढला.


नायकच बनला चोर

तेजश्रीचा लॅपटॉप दुसरं तिसरं कुणी चोरलं नव्हतं तर चित्रपटाचा नायक उमेश कामत यानेच तिचा लॅपटॉप चोरला होता. याविषयी उमेश म्हणाला. 'सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान तेजश्री अनेकवेळा वस्तू विसरून जात असे. तिच्या या विसरभोळ्या स्वभावामुळे मला आणि सुश्रुतला तिची गम्मत करावीशी वाटली. चित्रीकरण आटपून आम्ही सर्व हॉटेलमधून बाहेर पडलो होतो, त्यावेळी काहीवेळानंतर तेजश्री हॉटेलच्या रुममध्ये लॅपटॉप विसरली असल्याचे तिला कळलं. तिने याबाबत मला सांगितलं. मी लगेच हॉटेलच्या रिसेप्शनवर फोन करत, लॅपटॉपची चौकशी केली. तेथे परत गेल्यावर हॉटेलच्या रिसेप्शनवर तेजश्रीचा लॅपटॉप सुखरूप ठेवला असल्याचं दिसलं. त्याचवेळी कार्यकारी निर्माता आशुतोष हिंगेने मला फोन करून तेजश्रीला लॅपटॉप सापडल्याचं सांगू नकोस, आपण तिची गम्मत करूयात असं सुचवलं. मग मी सुद्धा अगदी तसंच केलं.’

उमेश-तेजश्रीची लव्ह केमिस्ट्री मांडणारा 'असेही एकदा व्हावे' हा चित्रपट येत्या ६ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमात शर्वाणी पिल्लई, डॉ. निखील राजेशिर्के, चिराग पाटील, कविता लाड आणि अजित भुरे हे कलाकारदेखील आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा