Advertisement

छाया कदमची स्वप्नपूर्ती

आपल्या अभिनयाला दाद मिळावी आणि त्याची पोचपावती राज्य पुरस्काराच्या रूपात मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. यंदाच्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री छाया कदमची स्वप्नपूर्ती झाली आहे.

छाया कदमची स्वप्नपूर्ती
SHARES

आपल्या अभिनयाला दाद मिळावी आणि त्याची पोचपावती राज्य पुरस्काराच्या रूपात मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. यंदाच्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री छाया कदमची स्वप्नपूर्ती झाली आहे.


न्यूडसाठी पुरस्कार

छायाचं स्वप्न होतं राज्य चित्रपट पुरस्कार पटकावण्याचं... 'न्यूड' चित्रपटातील भूमिकेसाठी छाया राज्य पुरस्काराची मानकरी ठरली आहे. कोणतीही व्यक्तिरेखा असली, तरी ती लीलया साकारणं हे छायाच्या यशाचं गमक आहे. गेल्या वर्षी छायाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकन मिळालं होतं, पण पुरस्कार मिळू शकला नव्हता. त्यामुळं स्वप्न साकार न झाल्याची किचिंत निराशा तिच्या मनात होती. मात्र, स्वभावानुसार छायानं सकारात्मक विचार केला आणि यंदा रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकार पुरस्कार पटकावला. या पुरस्काराच्या रुपानं मानाची बाहुली छायाच्या हाती विसावली. 


मागच्या वर्षी हुलकावणी 

प्रथमच राज्य पुरस्काराला गवसणी घालण्यात यशस्वी झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना छाया म्हणाली की, महाराष्ट्र शासनाचा 'सर्वोत्कृष्ट  सहकलाकारा'चा पुरस्कार मला मिळणं ही माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. दृष्ट लागू नये म्हणून घराघरात काळ्या बाहुल्या लावल्या जातात, पण आम्हा कलाकारांसाठी ही काळ्या बाहुलीची ट्रॉफी म्हणजे एक विशेष आकर्षण आहे. या पुरस्कारानं मागच्या वर्षी हुलकावणी दिली होती, पण यावर्षी हा पुरस्कार माझ्या हातात विसावताना माझ्यासह मित्रपरिवार-कुटुंबालाही खूप आनंद झाला आहे. 

 

झुलवामधून सुरूवात

वामन केंद्रेंच्या 'झुलवा' या नाटकातून माझ्या अभिनयाची सुरुवात झाली त्यानंतर अरुण नलावडे यांनी मला पहिला सिनेमा मिळवून दिला तो म्हणजे 'बाई माणूस'. नागराज मंजुळेंच्या 'फॅन्ड्री', 'सैराट', सागर वंजारीचा 'रेडू' श्रीराम राघवन यांचा 'अंदाधुन' अशा एकाहून एक सरस कलाकृतींचा भाग मला होता आलं याचा मला आनंद आहे. 'न्यूड'चा दिग्दर्शक रवी जाधवनं खूप अडचणींना तोंड देत जिद्दीनं हा चित्रपट उभा केला आहे. त्या पोर्ट्रेटमध्ये त्याला मी दिसणं हे माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या सहकलाकारांसह न्यूड मॉडेल्सनीही मला खूप शिकवलं, असंही छाया म्हणाली.हेही वाचा -

हिंदीतही येतोय 'बाळा'

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत रंगला ५६ वा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा
संबंधित विषय
Advertisement