Advertisement

हिंदीतही येतोय 'बाळा'

काही दिवसांपूर्वी 'बाळा' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. एका लहान मुलावर आधारित असलेल्या मराठी 'बाळा' मागोमाग हिंदीतही 'बाला' येत आहे.

हिंदीतही येतोय 'बाळा'
SHARES

काही दिवसांपूर्वी 'बाळा' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. एका लहान मुलावर आधारित असलेल्या मराठी 'बाळा' मागोमाग हिंदीतही 'बाला' येत आहे.


अनोखं टीझर 

मराठी आणि हिंदीत 'बाळा' असं एकच शीर्षक असलेले चित्रपट बनले असले तरी दोघांचाही परस्परांशी काडीचाही संबंध नाही. खरं तर हा हिंदीतील चित्रपट असल्यानं याचं शीर्षक 'बाला' असं आहे. नुकतंच या चित्रपटाचं अनोखं टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. तसं पाहिलं तर कोणत्याही चित्रपटाचं टीझर पोस्टर त्याची झलक दाखवणारं किंवा कथानकाबाबतचे संकेत देणारं असतं, पण 'बाला'चं पोस्टर काहीसं निराळंच आहे. हे पोस्टर म्हणजे एखाद्या केसविरहीत म्हणजेच टक्कल पडलेल्या व्यक्तीचं स्केच आहे. 


आयुष्मान-भूमी पुन्हा एकत्र 

या स्केचमध्ये दोन कान. कानांच्या वरच्या बाजूला डोक्यावर थोडे केस. बाकी सर्व भाग टक्कल. कपाळावर आठ्या आणि त्या खाली 'बाला' असं इंग्रजी अक्षरांमध्ये चित्रपटाचं शीर्षक लिहिलेलं पहायला मिळतं. दिनेश विजान यांच्या मॅडहॅाक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. भूमीनं आयुष्मानसोबत 'दम लगा के हैशा' या चित्रपटाद्वारे आपली अभिनय कारकिर्द सुरू केली आहे. त्यानंतर 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटातही ही जोडी एकत्र आली आहे.


२० नोव्हेंबरला प्रदर्शित

आता 'बाला'च्या निमित्तानं आयुष्मान-भूमी ही जोडी तिसऱ्यांदा एकत्र दिसणार आहे. त्यामुळं त्यांची केमिस्ट्रीही या चित्रपटाचा प्लस पॅाइंट ठरणार आहे. याशिवाय यामी गौतम ही दुसरी नायिकाही या चित्रपटात आहे. त्यामुळं एक वेगळाच रंग 'बाला'मध्ये अनुभवायला मिळणार अशी आशा बाळगायला हरकत नाही. यासोबत सौरभ शुक्ला, जावेद जाफरी आणि सीमा पाहवा हे कलाकार सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत. यंदा २० नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचंही या पोस्टरच्या माध्यमातून घोषित करण्यात आलं आहे.हेही वाचा -

अजय देवगणचे वडील विरु देवगण यांचं निधन

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत रंगला ५६ वा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा