Advertisement

पोलिसी खाक्या दाखवणार प्रीतम कागणे

बहुचर्चित ‘हलाल’ या सिनेमात आव्हानात्मक भूमिका साकारणारी प्रीतम आता पोलिसी खाक्या दाखवताना दिसणार आहे. ‘हलाल’, ‘३१ ऑक्टोबर’, ‘संघर्षयात्रा’ या चित्रपटांतील अभिनयाचं कौतुक झाल्यानंतर प्रीतम कागणे ‘अहिल्या’ या आगामी चित्रपटात एका डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

पोलिसी खाक्या दाखवणार प्रीतम कागणे
SHARES

काही अभिनेत्रींना अल्पावधीतच हृदयस्पर्शी भूमिका साकारण्याची संधी मिळते. मराठमोळी अभिनेत्री प्रीतम कागणे त्यापैकीच एक आहे असं म्हणता येईल. बहुचर्चित ‘हलाल’ या सिनेमात आव्हानात्मक भूमिका साकारणारी प्रीतम आता पोलिसी खाक्या दाखवताना दिसणार आहे.

‘हलाल’, ‘३१ ऑक्टोबर’, ‘संघर्षयात्रा’ या चित्रपटांतील अभिनयाचं कौतुक झाल्यानंतर प्रीतम कागणे ‘अहिल्या’ या आगामी चित्रपटात एका डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. या भूमिकेसाठी प्रीतमनं बुलेट चालवण्यापासून ते खडतर पोलिस प्रशिक्षणही घेतलं आहे. प्रचंड कष्ट करून आयपीएस झालेल्या एका महत्त्वाकांक्षी महिला पोलिस अधिकाऱ्याची रंजक कथा अहिल्या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

प्रीतमने व्यक्त केलं मत

या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रीतमनं विशेष मेहनत घेतली आहे. त्याविषयी प्रीतम म्हणते, यापूर्वी कधीही मी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारलेली नाही. ‘अहिल्या’ चित्रपटानं संधी दिली. पोलिसांच्या जगण्याचे विविध कंगोरे या भूमिकेत आहेत. या भूमिकेसाठी फिजिकल फिटनेस वाढवणं आवश्यक होतं. त्यामुळे सायकलिंग, स्वीमिंग, कराटे खेळायला शिकले. दोन महिन्याचं खडतर पोलिस प्रशिक्षणही घेतलं. आव्हान होतं, बुलेट शिकणं... बुलेट शिकताना चार-पाच वेळा धडपडलेही... मात्र, हार न मानता बुलेट चालवायला शिकल्याचं प्रीतम म्हणाली.


'हे' चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर

या चित्रपटात प्रीतमसोबत प्रिया बेर्डे, रोहित सावंत, अमोल कागणे, प्रमोद पवार, नूतन जयंत, निशा परूळेकर अशी स्टारकास्ट आहे. सुधीर चारी निर्मित या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केलं आहे. ‘अहिल्या’ या चित्रपटाखेरीज प्रीतमचा ‘मान्सून फुटबॉल’ या चित्रपटासह आणखी तीन चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.


हेही वाचा -

मराठी सिनेमा 'पार्टी'चा ट्रेलर लाँच

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा