Advertisement

मराठी सिनेमा 'पार्टी'चा ट्रेलर लाँच

मित्रांची गोष्ट सांगणाऱ्या ‘पार्टी’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. ‘पार्टी’ हा सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित या ‘पार्टी’च्या रंगतदार ट्रेलर लाँच सोहळ्याला चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली.

मराठी सिनेमा 'पार्टी'चा ट्रेलर लाँच
SHARES

'मैत्रीसाठी काहीही...' असं म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा मैत्रीच्या आणाभाका ते विसरतात! भविष्याच्या तरतुदीसाठी धडपडणारे हे सर्व मित्र मग केवळ आठवणींच्या कुपीत किंवा एका फोटोच्या चौकटीतच सीमित राहतात. अशाच मित्रांची गोष्ट सांगणाऱ्या ‘पार्टी’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे.


'पार्टी’चा रंगतदार ट्रेलर

करियरच्या मागे धावताना केवळ भूतकाळातील आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या सर्व मित्रांना पुन्हा एकदा एकत्र येण्यास प्रवृत्त करणारा ‘पार्टी’ हा सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित या ‘पार्टी’च्या रंगतदार ट्रेलर लाँच सोहळ्याला चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली.


सिनेमाची कथा?

मैत्रीचा हँगओव्हर चढवणाऱ्या ‘पार्टी’च्या ट्रेलरमध्ये सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर या चार मित्रांची धम्माल-मस्ती आणि त्यांची लव्हस्टोरी पाहायला मिळते. त्यासोबतच कालांतराने विभक्त झालेल्या या चौकडींचं दु:खही यात आहे. या चौघांसोबतच प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपालादेखील ट्रेलरमध्ये आहेत.


विनोदाची परिपूर्ण मेजवानी

आपापल्या आयुष्यात आणि संसारात गुंग झाल्यानंतर मागे राहून गेलेल्या जुन्या मित्रांची आठवण ‘पार्टी’ सिनेमाचा ट्रेलर करून देतो. धम्माल विनोदाची परिपूर्ण मेजवानी देणाऱ्या या सिनेमाचा ट्रेलर पाहताना, ‘पार्टी’ हा सिनेमा प्रेक्षकांना हसवून लोटपोट करेल, याचा अंदाज येतो. हसू आणि आसू आणणारा असा हा सिनेमा आहे. नवविधा प्रोडक्शन निर्मित आणि डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांची प्रस्तुती असलेला हा सिनेमा तमाम मित्रांचं नातं आणखीन घट्ट करणारा आहे.


हेही वाचा -

शिरीष राणेचे ‘तेरा दिवस प्रेमाचे’

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा