Advertisement

'स्माईल प्लीज'नं केली आदितीची इच्छापूर्ती

आदिती गोवित्रीकर लकी आहे. 'स्माईल प्लीज' या आगामी मराठी चित्रपटानं विक्रम फडणीस या मित्तासोबत काम करण्याची तिची इच्छा पूर्ण केली.

'स्माईल प्लीज'नं केली आदितीची इच्छापूर्ती
SHARES

काही कलाकार-तंत्रज्ञ एकमेकांचे मित्र असतात, पण त्यांना एकत्र काम करण्याची फार संधी मिळत नाही. या बाबतीत आदिती गोवित्रीकर लकी ठरली आहे. 'स्माईल प्लीज' या आगामी मराठी चित्रपटानं विक्रम फडणीससोबत काम करण्याची तिची इच्छा पूर्ण केली.


रिंगा रिंगाद्वारे पदार्पण 

आदिती गोवित्रीकर हे मराठमोळं नाव आज संपूर्ण जगाला ठाऊक आहे. डाॅक्टर, अॅक्ट्रेस, माॅडेल असलेली आदिती २००० मध्ये मिसेस इंडिया बनली आणि खऱ्या अर्थानं नावारूपाला आली. आजवरच्या कारकिर्दीत हिंदी चित्रपटातही मोजक्याच भूमिका साकारणाऱ्या आदितीनं २००९ मध्ये संजय जाधवच्या 'रिंगा रिंगा' या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आता लवकरच ती विक्रम फडणीसच्या 'स्माईल प्लीज' या दुसऱ्या मराठी चित्रपटात झळकणार आहे.


इच्छा पूर्ण झाली

विक्रम आणि अदितीची मैत्री खूप जुनी आहे. आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्या मराठी चित्रपटात विक्रमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबाबत आदिती म्हणाली की, सुरुवातीच्या काळात विक्रम नृत्यदिग्दर्शक होता आणि त्याचे शोज मी आवर्जून पाहायचे. तेव्हापासून आमची मैत्री आहे. ज्यावेळी त्यानं 'हृदयांतर' हा चित्रपट केला, त्यावेळी भविष्यात त्याच्या चित्रपटाचा भाग व्हावा असं मला मनापासून वाटलं होतं. त्यानं मला 'स्माईल प्लीज' या चित्रपटासाठी विचारणा केली आणि माझी ही इच्छा लवकरच पूर्ण झाली.


 कथानक सशक्त 

मित्रासोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत अदिती म्हणाली की, ओळखीच्या व्यक्तीसोबत काम करणं नक्कीच सोपं असतं. कारण त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी आपल्याला ठाऊक असतात. त्यामुळं अभिनय करणं सहज शक्य होतं असं आदितीचं मत आहे. चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी अदिती म्हणाली की, या चित्रपटाचं कथानकच मुख्य हिरो आहे. कथानक अतिशय सशक्त असल्यानं हा चित्रपट नक्कीच उत्कृष्ट ठरेल. वैयक्तिक जीवनात मी डॉक्टर असून, पडद्यावरही डॉक्टरची भूमिका साकारली आहे. माझ्या शिक्षणाचा मला अभिनय करताना खूपच उपयोग झाला.


१९ जुलै रोजी प्रदर्शित

आदितीच्या डाॅक्टरी शिक्षणाबाबत सांगायचं तर तिने मुंबईतील ग्रँट मेडिकल काॅलेजमधून एमबीबीएस केलं आहे. याशिवाय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून तिनं समुपदेशन हा अभ्यासक्रम घेऊन पदविका संपादित केली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून सायकोलॉजीमधून मास्टर्स केलं आहे. सध्या ती हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून सायकोलॉजीमध्ये पुन्हा मास्टर्स करत आहे. आदितीची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'स्माईल प्लीज' १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा -

दोन वेंगसरकर एकत्र!

शंकर महादेवन यांच्या गायनाचा 'मोगरा फुलला'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा