Advertisement

शंकर महादेवन यांच्या गायनाचा 'मोगरा फुलला'

मागील काही दिवसांपासून 'मोगरा फुलला' या चित्रपटाच्या बाबतीत बऱ्याच नावीन्यपूर्ण बातम्या येत आहेत. या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकमध्ये शंकर महादेवन यांच्या आवाजाचा 'मोगरा फुलला' आहे.

शंकर महादेवन यांच्या गायनाचा 'मोगरा फुलला'
SHARES

मागील काही दिवसांपासून 'मोगरा फुलला' या चित्रपटाच्या बाबतीत बऱ्याच नावीन्यपूर्ण बातम्या येत आहेत. या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकमध्ये शंकर महादेवन यांच्या आवाजाचा 'मोगरा फुलला' आहे. 

अभिनयातही चुणूक 

खरं तर महादेवन हे गायक-संगीतकार तर आहेतच, पण त्यासोबतच अभिनयातही त्यांनी आपली चुणूक दाखवली आहे. 'मोगरा फुलला' या चित्रपटाची खासियत म्हणजे आजवर आपल्या संगीत दिग्दर्शनाखाली दिग्गज गायकांना गायला लावणाऱ्या महादेवन यांनी त्यांच्यापेक्षा वयानं फार कमी असलेल्या संगीतकारासाठी हे गाणं गायलं आहे. गायनाकडून संगीत दिग्दर्शनाकडं वळलेल्या रोहित राऊतनं 'मोगरा फुलला' या चित्रपटातील गीतांना संगीत दिलं आहे. महादेवन यांच्या आवाजात रेकॅार्ड करण्यात आलेलं टायटल ट्रॅकही रोहितनंच संगीतबद्ध केलं आहे.


चित्रपटाच्या कथेचं सार

'हलके अन हळुवारसा... हो मुका अन अलवारसा... अधिऱ्या अधिऱ्या या अंगणी, अपुऱ्या अपुऱ्या माझ्या मनी... मोगरा फुलला, मोगरा फुलला...' असे अलवार बोल असलेलं हे शीर्षकगीत महादेवन यांनी तितक्याच तरलेनं गायलं आहे. हे गीत आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांना आवडल्यानं मराठी रसिकांमध्ये लोकप्रिय होईल, असा विश्वास महादेवन यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. स्वप्नील जोशी, त्याची आॅनस्क्रीन आई नीना कुलकर्णी, सई देवधर आणि इतर कलाकारांवर चित्रीत झालेलं हे गाणं जणू चित्रपटाच्या कथेचं सार सांगून जातं. 


व्यक्तिरेखांची स्थिती गाण्यात

मनाच्या विविध अवस्था अधोरेखित करताना, चित्रपटाचा नायक आणि यातील इतर व्यक्तिरेखांची नेमकी स्थिती या गाण्यात सादर करण्यात आली आहे. विविध मानवी भावभावनांचा हिंदोळा या कथेतून हळुवार हलवण्यात आला असल्याची जाणीव या गीतातून होते. पद्मश्री शंकर महादेवन यांच्यासाठी मराठी संगीत आणि चित्रपटसृष्टी नवीन नाही. 'कट्यार काळजात घुसली'मध्ये त्यांचा संगीताभिनय महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांनी पाहिला आहे. आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांसाठी गायन करणाऱ्या महादेवन यांचं हे गीत रसिकांच्या मनातही मोगरा फुलवणारं असल्याचं बोललं जात आहे.


१४ जून रोजी प्रदर्शित

'मोगरा फुलला' १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांच्याबरोबर चंद्रकांत कुलकर्णी, संदिप पाठक, नीना कुळकर्णी, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शिका श्रावणी देवधर 'मोगरा फुलला'च्या निमित्तानं बऱ्याच वर्षांनी पुन्हा दिग्दर्शनाकडं वळल्या आहेत.

लिंक- https://www.youtube.com/watch?v=_6DjXo_n_Ecहेही वाचा  -

आजच्या व्यक्तिरेखांसोबत संतोषचं 'यदा कदाचित रिटर्न'

'गंगा-जमुना' चित्रपटगृह लवकरच होणार जमीनदोस्त ?
संबंधित विषय
Advertisement