Advertisement

दोन वेंगसरकर एकत्र!

मराठमोळे क्रिकेटर दिलीप वेंगसरकर रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ‘८३’ या आगामी हिंदी चित्रपटात वेंगसरकरांची भूमिका साकारणारा आदिनाथ कोठारे साकारत आहे. आदिनाथनं त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

दोन वेंगसरकर एकत्र!
SHARES

आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीनं गोलंदाजांच्या उरात धडकी भरवणारे मराठमोळे क्रिकेटर दिलीप वेंगसरकर रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ‘८३’ या आगामी हिंदी चित्रपटात वेंगसरकरांची भूमिका साकारणारा आदिनाथ कोठारे साकारत आहे. आदिनाथनं त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.


सोनेरी क्षणांची गाथा

दिग्दर्शक कबीर खान मागील बऱ्याच दिवसांपासून ‘८३’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघानं विश्वचषकाला गवसणी घातलेल्या सोनेरी क्षणांची गाथा या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग साकारत असून, कपिल यांच्यासोबत खेळलेल्या संपूर्ण टिमचाही समावेश आहे. या टिममध्ये सहभागी असलेल्या दिलीप वेंगसरकर यांनीही विश्वचषक पटकावण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. त्यामुळं आदिनाथकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे.


फोटो शेअर

आदिनाथनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो दिलीप वेंगसरकर यांच्यासोबत आहे. ‘सर्वोत्त्कृष्ट भारतीय फलंदाजांपैकी एक! तंत्रशुद्ध फलंदाजी ही त्यांची खासियत! अशा दिग्गजाची व्यक्तिरेखा चितारणं म्हणजे एक सन्मान असून, वेगळं आव्हानही आहे. ‘कोलोनल’ दिलीप बळवंत वेंगसरकर ‘८३’ या चित्रपटात रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.’ अशा आशयाच्या ओळी आदिनाथनं वेंगसरकरांसोबतच्या फोटोसोबत लिहीत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.


वास्तव जीवनातील व्यक्तिरेखा

कपिल आणि वेंगसरकर यांच्यासोबत रोमी भाटिया, सुनील गावसकर, मोहिंदर अमरनाथ, बलविंदर संधू, कृष्णमाचारी श्रीकांत, सय्यद किरमाणी, संदिप पाटील, रवी शास्त्री, किर्ती आझाद, यशपाल शर्मा, राजर बिन्नी, मदन लाल आदी वास्तव जीवनातील व्यक्तिरेखाही या चित्रपटात आहेत. रोमी भाटिया म्हणजेच कपिल यांच्या पत्नीची भूमिका दिपीका पदुकोण साकारणार असल्यानं या चित्रपटात पुन्हा एकदा रणवीर-दीपिकाची जोडी जमली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून सर्व कलाकार ८३च्या क्रिकेट टिममधील सदस्यांकडून क्रिकेटचे धड घेत आहेत. यात आदिनाथचाही समावेश आहे.



हेही वाचा-

ऐश्वर्याचा ट्वीटरवर शेअर केलेला फोटो विवेक ओबेरॉयला भोवला

भारतीय नौदलावर आधारित 'नेव्ही डे'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा