Advertisement

अमेयची ‘सई’ गर्लफ्रेंड पाहिली का?

मागील काही दिवसांपासून अभिनेता अमेय वाघ आपल्या ‘गर्लफ्रेंड’मुळं सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळं अमेयची ‘गर्लफ्रेंड’ आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना सतावत होता. आता याचं उत्तर मिळालं आहे.

अमेयची ‘सई’ गर्लफ्रेंड पाहिली का?
SHARES

मागील काही दिवसांपासून अभिनेता अमेय वाघ आपल्या ‘गर्लफ्रेंड’मुळं सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळं अमेयची ‘गर्लफ्रेंड’ आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना सतावत होता. आता याचं उत्तर मिळालं आहे.


उत्तर पोस्टरमधून

आजवर पर्ण पेठे, मिथिला पालकर या अभिनेत्रींसोबत जोडी जमवणाऱ्या अमेयच्या ‘गर्लफ्रेंड’ या आगामी चित्रपटात त्याची गर्लफ्रेंड कोण बनली आहे? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला ‘गर्लफ्रेंड’ मिळाली का? असंही विचारलं. अखेर या प्रश्नाचं उत्तर चित्रपटाच्या पोस्टरमधून मिळालं आहे. ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात नचिकेत प्रधान बनलेल्या अमेयला त्याची अलिशा मिळाली आहे. महाराष्ट्राची सुपरस्टार अभिनेत्री सई ताम्हणकर ‘गर्लफ्रेंड’च्या पोस्टरवर अमेयसोबत दिसत आहे.


अमेय-सई पहिल्यांदाच एकत्र 

‘गर्लफ्रेंड’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अमेय आणि सई पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याचं यावरून नक्की झालं आहे. या चित्रपटात लेखक-दिग्दर्शक उपेंद्र सिधये यांनी आजच्या टेक्नोसॅव्ही जगातील एका मुलाची कथा मांडली आहे. या चित्रपटासाठी अमेयनं खास तयारी केली असून, त्यानं नचिकेतच्या व्यक्तिरेखाठी तब्बल आठ किलो वजन वाढवलं होतं. याखेरीज त्यानं या चित्रपटासाठी आपला लुकही बदलला आहे. सईचाही एक हटके अंदाज या चित्रपटात पहायला मिळणार असल्याचं पोस्टर पाहिल्यावर जाणवतं.


२६ जुलै रोजी प्रदर्शित

चित्रपटाच्या टीझरमध्ये ‘गर्लफ्रेंड तर पाहिजे ना यार’ असं म्हणत ‘मी गर्लफ्रेंड पटवणारच’ हा दृढनिश्चय केलेल्या नचिकेताला त्याची अलिशा कशी? कुठे? आणि कधी मिळाली? हे पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. २६ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या इतर कलाकारांची नावं अद्याप घोषित करण्यात आलेली नाहीत.हेही वाचा -

'स्माईल प्लीज'नं केली आदितीची इच्छापूर्ती

दोन वेंगसरकर एकत्र!
संबंधित विषय
Advertisement