Advertisement

रुपेरी पडद्यावर झळकणार छत्रपतींचे 'सरसेनापती हंबीरराव'

आजवर जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य चित्रपटाच्या माध्यामातून सर्वदूर पोहोचवण्याचं काम करण्यात आलं, तशी त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची गाथाही रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. आता छत्रपतींचे 'सरसेनापती हंबीरराव' मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

रुपेरी पडद्यावर झळकणार छत्रपतींचे 'सरसेनापती हंबीरराव'
SHARES

आजवर जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य चित्रपटाच्या माध्यामातून सर्वदूर पोहोचवण्याचं काम करण्यात आलं, तशी त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची गाथाही रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. आता छत्रपतींचे 'सरसेनापती हंबीरराव' मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.


पोस्टर अनावरण

हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य इतिहासाची महती सांगणाऱ्या 'सरसेनापती हंबीरराव' या मराठी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. पुण्यातील कोंढणपूर येथे या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचा अनावरण सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या किल्यावर रोवली अशा तोरणा आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड या किल्यावरुन हेलीकॉप्टरने चित्रपटाचे पोस्टर आकाशात लाँच करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला होता. 


शूरगाथा 

शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत आयोजित केलेल्या या सोहळ्याला चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, निर्माते संदीप रघुनाथराव मोहिते पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा, सौजन्य निकम तसंच मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे, अभिनेते रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर, लेखक-दिग्दर्शक-अभिनेते किरण यज्ञोपवित, देवेंद्र गायकवाड, संगीतकार नरेंद्र भिडे, गीतकार प्रणीत कुलकर्णी, शिवव्याख्याते सौरभ कर्डे, कला दिग्दर्शक एकनाथ कदम, मार्केटिंग सल्लागार विनोद सातव इ. मान्यवर उपस्थित होते. गत वर्षी 'फर्जंद'च्या माध्यमात लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं कोंडाजी फर्जंद या शिवरायांच्या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सादर केल्यानंतर 'सरसेनापती हंबीरराव'च्या माध्यमातून तरडे आता हंबीरराव मोहिते यांची शूरगाथा सादर करणार आहेत.


२०२० च्या सुरुवातीला प्रदर्शित

'देऊळ बंद' आणि 'मुळशी पॅटर्न' या मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केल्यानंतर तरडे यांनी 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटात ऐतहासिक विषय हाताळला आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच झाल्यानंतर यात छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या इतर ऐतिहासिक व्यक्तिरेखा कोण साकारणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. घोषणेनंतर लगेचच चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करण्यात येणार आहे. २०२० च्या सुरुवातीला हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याची योजना आखण्यात आली आहे.



हेही वाचा  -

बिचुकलेंना शिवानी देणार घरकामाचे धडे!

सलमान खानने बाॅडीगार्डच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ झाला व्हायरल




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा