बिचुकलेंना शिवानी देणार घरकामाचे धडे!

'बिग बॉस'चं घर इथे येणाऱ्या प्रत्येकाला काही ना काही शिकवतं. या घरातील सदस्यही एकमेकांना धडा शिकवण्यासाठी धडपडत असतात. शिवानी सुर्वे मात्र अभिजीत बिचुकलेंना घरकामाचे धडे देणार आहे.

  • बिचुकलेंना शिवानी देणार घरकामाचे धडे!
  • बिचुकलेंना शिवानी देणार घरकामाचे धडे!
  • बिचुकलेंना शिवानी देणार घरकामाचे धडे!
SHARE

'बिग बॉस'चं घर इथे येणाऱ्या प्रत्येकाला काही ना काही शिकवतं. या घरातील सदस्यही एकमेकांना धडा शिकवण्यासाठी धडपडत असतात. शिवानी सुर्वे मात्र अभिजीत बिचुकलेंना घरकामाचे धडे देणार आहे.


चांगली गट्टी

'बिग बॉस' मराठीच्या घरामध्ये माधव देवचक्के आणि अभिजीत बिचुकले यांची चांगली गट्टी जमली आहे. आज माधव आणि बिचुकलेंमध्ये एक संभाषण होताना दिसणार आहे. ज्यात माधव म्हणतो की, तुम्ही सगळे माझी बाहेर जाण्याची वाट बघत आहात. मी इथे वाट बघतो आहे तुम्हाला बाहेर पाठविण्याची. हेच करतायना तुम्ही? त्यावर बिचुकले म्हणाले की, १०० टक्के... दिगंबर नाईक तिथे येताच या दोघांनी आज आमचा परफॅार्मंस असल्याचं कारण सांगितलं. त्यानंतर माधवनं हेच संवाद हिंदीमध्ये कसे म्हणायचे हे बिचुकले यांना दाखवलं. आता हा खरोखर एखाद्या टास्कचा भाग आहे की आणखी काही राजकारण ते आज समजेल.


झाडू कशी मारायची

शिवानी सुर्वे पुन्हा एकदा बिचुकले यांची शाळा घेताना दिसणार आहे. त्याचे असे झालं कि, शिवनं कॅप्टन झाल्यावर घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी सदस्यांना वेगवेगळ्या टीम्समध्ये टाकलं. त्यामुळं बिचुकले आणि शिवानी हे एका टीममध्ये आले. बिचुकले यांना घरच्या कामाची फारशी सवय नाही आणि त्यांना ते जमत देखील नाही याचा अंदाज शिवानीला आला आहे. त्यामुळं शिवानीनं शिवला सांगितलं कि, मी जेवणाच्या टीममध्ये जाते. बिचुकलेंनी मारलेली झाडू शिवानीला न आवडल्यानं ती आता बिचुकले यांना झाडू कशी मारायची हे शिकवते का ? ते पहायचं आहे. याआधी तिनं बिचुकलेंना त्यांचे कपडे आणि जागा कशी साफ ठेवावी हे शिकवले आहे.


चोर बाजार

बिग बॉसच्या घरात चोर बाजार या साप्ताहिक कार्यानं चांगलाच जोर पकडला आहे. टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरीच बाचाबाची, धम्माल-मस्ती बघायला मिळत आहे. काल शिवानी आणि शिवमध्ये बराच वाद झाला. चोरांनी मारामारी करू नये, असं शिवचं म्हणणं होतं. तर बिग बॉस यांनी दोन्ही टीमसोबत संचालक मैथिलीला दोन्ही टीम चोर बाजार हा खेळ बरोबर खेळत नसून संचालक देखील दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर बिग बॉस यांनी सदस्यांना पुन्हा कार्य करण्यास परवानगी दिली.


किशोरी शहाणे नाराज

या टास्क दरम्यान अभिजीत केळकरवर किशोरी शहाणे खूपच नाराज झाल्या. त्यानं आणि त्याच्या टीमनं टास्कदरम्यान केलेली नासधूस त्यांना आवडलेली नाही.. वीणाचंही मत हेच होतं कि, अभिजीतनं खूप वाईट रीतीनं टास्क पार पाडला. हे वाद ज्यामुळं झाले ते किशोरी यांचे सामान सापडलं. तरी देखील विरुध्द टीमला खजील वाटावं म्हणून वीणाच्या सांगण्यावरून किशोरींनी रडण्याचं नाटक केलं. किशोरी यांनी रुपालीलाही सांगितलं कि, अभिजितला मी सोडणार नाही. त्यांनी ही खंत बिचुकलेंकडेही व्यक्त केली. 


इकडच्या गोष्टी तिकडं

शिव इकडच्या गोष्टी तिकडं करतो असं वैशाली आणि दिगंबर यांचं म्हणणं आहे. शिवानीनं अभिजित आणि माधवविरुध्द टीमचं बोलणं सांगितलं कि, या टीमनं जंगली लोकांसारखा खेळ खेळला आपण तसं नाही खेळायचं. शिवानीनं बोलताना माधव आणि अभिजीतला सांगितलं की, मला पूर्ण खात्री आहे ते देखील तसाच खेळ खेळणार. आता विरुध्द टीम आज कोणत्या प्रकारे टास्क पार पाडेल हे आज बघायला मिळणार आहे. माधवनं टास्क सुरु होण्याआधीच त्याचे काही कपडे लपवून ठेवले, तर वीणा दुसऱ्या टीमच्या सदस्याचे आणि रुपालीनं बिचुकले यांचे कपडे टास्क सुरू होण्याआधी स्वत:च्या ताब्यात घेतले. आता दूसरी टीम आज कशा प्रकारे टास्क पार पाडते ते पहायचं आहे.


 मेकअप कीट विरुध्द चोर

चोर बाजार हा टास्क सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु आहे. या टास्कमध्ये सदस्यांच्या बऱ्याच गोष्टी चोर टीमचे सदस्य चोरत आहेत. यामध्येच रुपालीचा मेकअप कीट विरुध्द चोर बनलेल्या टीमनं घेतला. पराग यावरूनच किशोरी यांच्याशी गप्पा मारताना मजेत बोलताना म्हणाला कि, लोक २ तास ३७ मिनिट मेकअप करत आहेत, तर रुपालीची बाजू घेत किशोरी म्हणाल्या की, बिचारीचा मेकअप कीट चोरला आहे तरी ती सांभाळून घेत आहे. असं नाही हं बोलायचं. त्यावर पराग म्हणाला की, हे आपल्यातच राहू दे. तिला नका सांगू मी असं बोललो. नाही तर माझी वाट लागेल. हेही वाचा -

RBI ची रेपो दरात ०.२५% ची कपात

मालाड स्थानकात रेलिंगमध्ये अडकून महिलेचं बोट तुटलंसंबंधित विषय
ताज्या बातम्या