Advertisement

मालाड स्थानकात रेलिंगमध्ये अडकून महिलेचं बोट तुटलं

पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड स्थानकातील जिना उतरतेवेळी रेलिंगचा धारदार भाग घासल्यानं एका महिलेचं अर्ध बोट कापल्याची घटना घडली आहे.

मालाड स्थानकात रेलिंगमध्ये अडकून महिलेचं बोट तुटलं
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड स्थानकातील जिना उतरतेवेळी रेलिंगचा धारदार भाग घासल्यानं एका महिलेचं अर्ध बोट कापल्याची घटना घडली आहे. मीनल उमराव (५१) असं या महिलेचं नाव असून, बुधवारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार करण्याची तयारी दाखवली आहे.


स्टील कॅपला धार

मीनल या वांद्रे येथील एका कंपनीत कम्प्युटर ऑपरेटरची नोकरी करत आहेत. मीनल बुधवारी १०.४५ वाजताच्या सुमारास मालाड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील जिन्यावरून उतरत होत्या. खाली उतरत असताना त्यांचा रोलिंगच्या स्टिलच्या कॅपमध्ये उजव्या हाताचं बोट अडकलं. त्यावेळी बोट अडकल्यानं त्या तोल जाऊन खाली पडल्या इतक्यातचं त्या स्टील कॅपला धार असल्यानं त्यांच्या हाताचं अडकलेलं बोट कापलं गेलं.


बोट पुन्हा जोडणार

मीनल यांच्या पतींनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. बोट कापल्यामुळं रेल्वेनं त्यांच्यावर उपचार करण्याची तयारी दार्शवली आहे. मीनल यांना उपचारासाठी रेल्वेनं ५ हजार रुपये दिल्याचं समजतं आहे. त्याशिवाय, मीनल यांच्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया केली जाणार असून तुटलेलं बोट पुन्हा जोडले जाणार असल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

RBI ची रेपो दरात ०.२५% ची कपात

उद्धव ठाकरे पुन्हा करणार अयोध्या वारी!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा