SHARE

अभिनेता सलमान खानने आपल्याच बाॅडीगार्डच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. बाॅडीगार्डला मारण्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. काही ट्विटर यूजर्सचं म्हणणं आहे की, सलमान खानने बरोबर केलं. तर काहींनी याला चुकीचं ठरवलं आहे. कारण काय?

व्हिडीओमध्ये सलमान लोकांच्या गर्दीतून सिनेमागृहातून बाहेर येताना दिसत आहे. यावेळी अचानकपणे आपल्या बाॅडीगार्डला तो थप्पड मारत असल्याचं दिसत आहे. हा बाॅडीगार्ड सलमान खानला गर्दीतून बाहेर नेण्यासाठी रस्ता मोकळा करून देत होता. मात्र, सलमानने त्याला थप्पड का मारली हे काही स्पष्टपणे दिसून येत नाही. बाॅडीगार्डने एका तरूण चाहत्याला धक्का दिला. म्हणून सलमानने त्याला मारले, असंही बोललं जात आहे. हेही वाचा -

मुक्ताच्या 'बंदिशाळा'चे संगीतमय प्रोमो

मृण्मयी-सिद्धार्थच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर
संबंधित विषय
ताज्या बातम्या