Advertisement

मृण्मयी-सिद्धार्थच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर

काही कलाकार खूप वर्ष समान रेषेत काम करत राहतात, पण कधीच एकत्र दिसत नाहीत. अशाच प्रकारे आजवर मराठी चित्रपटसृष्टीत काम करणारे मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोन कलाकार प्रथमच एकत्र आले आहेत.

मृण्मयी-सिद्धार्थच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर
SHARES

काही कलाकार खूप वर्ष समान रेषेत काम करत राहतात, पण कधीच एकत्र दिसत नाहीत. अशाच प्रकारे आजवर मराठी चित्रपटसृष्टीत काम करणारे मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोन कलाकार प्रथमच एकत्र आले आहेत.


ट्रेलर लाँच 

मृण्मयी आणि सिद्धार्थ या दोन समकालीन कलाकारांनी आजवर रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांमध्ये बरंच काम केलं आहे. कॅालेजवयीन जीवनात एकांकिकेमध्ये सर्वप्रथम एकत्र आलेले मृण्मयी-सिद्धार्थ खूप चांगले मित्र आहेत, पण त्यांना एकत्र घेऊन अद्याप कोणीही चित्रपट बनवलेला नाही. दिग्दर्शक समीर जोशी यांनी 'मिस यू मिस्टर' या चित्रपटात दोघांना मुख्य भूमिकेत सादर केलं आहे. मृण्मयी-सिद्धार्थचा पहिलाच एकत्र चित्रपट असलेल्या 'मिस यू मिस्टर'चा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे.


संगीत अनावरण

मराठी सिनेसृष्टीतील सिद्धार्थ आणि मृण्मयी ही ग्लॅमरस जोडी प्रेक्षकांना प्रथमच रूपेरी पडद्यावर एकत्र पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईत पार पडला. या प्रसंगी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आलाप देसाई, आनंदी जोशी यांनी आपल्या गायनानं सोहळ्यात बहार आणली. 'मिस यू मिस्टर' या चित्रपटातील गीतं वैभव जोशी यांनी लिहिली आहेत. या चित्र्घ्पटात मृण्मयी-सिद्धार्थच्या जोडीला राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदी कलाकारांचा समावेश आहे. 


लाँग डिस्टंटन्स रिलेशनशिप

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये वरुणच्या भूमिकेतील सिद्धार्थ आणि मृण्मयीनं साकारलेली कावेरी हे नवविवाहित जोडपं पहायला मिळतं. वरुणला कामानिमित्तानं काही दिवसात लंडनला जावं लागतं आणि सुरु होतं ते 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप'. यादरम्यान बऱ्याच समस्या येतात असं दिसतं. यातून ते कसा मार्ग काढतात हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हा संपूर्ण सिनेमा 'लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप' वर भाष्य करणारा आहे, जे नवरा बायको एकमेकांपासून कामानिमित्ताने लांब राहतात त्याच्यासाठी आणि जे नवविवाहित जोडपं आहे अशा सर्वाना हा चित्रपट आपलासा वाटेल.


जीवनशैलीचं दर्शन

'वाढलेल्या अंतरातून फुलणार प्रेम!' अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यातून या चित्रपटाची कथा संकल्पना अधोरेखित होतेच, पण त्याचबरोबर आज प्रकाशित झालेल्या ट्रेलरमुळे कथेचा पोत अधिकाधिक उलगडत जातो. आपल्या करियरच्या निमित्तानं आजची तरुण जोडपी एकमेकांपासून दूर राहतात, त्यांच्यातील दुरावा वाढतो. प्रेमाच्या नात्याला ओढ लागते, तर कधीकधी त्यावर ताणही येतो. अर्थातच त्यांच्या नात्यामध्ये, कौटुंबिक बंधांमध्ये अनेक बदल घडतात. नव्या पिढीच्या नजरेतून, त्यांच्या जीवनशैलीचं दर्शन घडवत ही कथा आकाराला येते.



हेही वाचा -

...आणि किशोरी शहाणेंना अनावर झाले अश्रू

ज्येष्ठ विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचं निधन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा