Advertisement

'जबरदस्त' पुष्कर जोग बनला बाबा!


'जबरदस्त' पुष्कर जोग बनला बाबा!
SHARES

मुलींमध्ये चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता स्वप्नील जोशी नुकताच बाबा झाला. स्वप्नीलची बायको लीनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. अभिनेता स्वप्नील जोशी पाठोपाठ आता आणखी एक मराठी अभिनेता बाबा बनला आहे. अभिनेता पुष्कर जोगच्या घरी एका परीचं आगमन झालं आहे. पुष्करची बायको जस्मिनने एका मुलीला जन्म दिला आहे.


सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी!

पुष्करने ही गोड बातमी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना दिली. त्याने जस्मिन गरोदर असताना फोटो शूट केलं होतं. पुष्करच्या आयुष्यात एक चिमुकली आल्यामुळे कुटुंबात नवीन सदस्याचा प्रवेश झाला आहे, असं त्याने म्हटलं आहे.


पुष्करच्या गजलेल्या भूमिका

पुष्करने अनेक मराठी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे, तर मालिकांमध्येही पुष्करने आपला ठसा उमटवला आहे. त्याने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'सून लाडकी सासरची', 'रावसाहेब' या चित्रपटातून त्याने बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या. तर 'जबरदस्त', 'मिशन पॉसिबल' हे पुष्करचे गाजलेले चित्रपट असून 'वचन दिले तू मला', 'धुमशान' या मालिकांमधील पुष्करची भूमिका लक्षवेधी ठरली.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा