Advertisement

माधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये आणखी एक बॉलिवूड अभिनेता!


माधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये आणखी एक बॉलिवूड अभिनेता!
SHARES

धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या मराठी चित्रपटसृष्टीतील पदापर्णसाठी सगळेच उत्सुक आहेत. 'बकेट लिस्ट' या आपल्या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटातून ती आता प्रेक्षकांवर भुरळ घालणार आहे. २५ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांची 'बकेट लिस्ट' पूर्ण करणार आहे. या चित्रपटातून आणखी एक बॉलिवूड अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



'बकेट लिस्ट'मधून तरूणींचा लाडका अभिनेता रणबीर कपूर मराठी चित्रपटसृष्टीतील पदापर्ण करणार आहे. रणबीरच्या या पदार्पणामुळे त्याचे चाहते भलतेच खूष होणार आहेत. रणबीर हा माधुरीचा खूप मोठा फॅन आहे. सर्वात मोठा चाहता म्हणवणाऱ्या रणबीरला पुन्हा एकदा तिच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. या आधी 'ये जावानी है दिवानी' या चित्रपटातील 'घागरा' या गाण्यात ते दोघं तुफान नाचताना दिसले. त्यानंतर आता 'बकेट लिस्ट' या मराठी चित्रपटातून दोघेही एकत्र मराठी चित्रपटसृष्टीत पदापर्ण करत आहेत. रणबीर या चित्रपटात पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.


भूमिकेबाबत अस्पष्टता

'बकेट लिस्ट' या चित्रपटात रणबीर नेमक्या कोणत्या भूमिकेत असणार आहे? त्याचा रोल किती वेळाचा असेल? याबबात कोणतीच माहिती अद्याप देण्यात आली नाही.

रणबीरच्या आधी आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याचं नावं 'बकेट लिस्ट'मध्ये अॅड झालं आहे. ते म्हणजे निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचं. करणच्या धर्मा प्रॉडक्शनचाही समावेश बकेट लिस्टमध्ये आहे. तेजस देओस्कर दिग्दर्शित हा चित्रपट २५ मे ला प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

असा आहे धकधक गर्लचा 'बकेट लिस्ट'!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा