‘बॉईज २’च्या ट्रेलर लाँचला 'यांनी' केली धमाल!

मुंबईतील लोअर परळ येथे पार पडलेल्या ‘बॉईज २’ च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात, तरुणांचा लाडका गायक अवधूत गुप्तेच्या लाईव्ह गाण्याने उपस्थितांची संध्याकाळ शानदार बनली. याखेरीज सुमंत शिंदे आणि सायली पाटील यांनीही आपल्या परफॅार्मंसद्वारे या सोहळ्यात रंग भरले.

  • ‘बॉईज २’च्या ट्रेलर लाँचला 'यांनी' केली धमाल!
  • ‘बॉईज २’च्या ट्रेलर लाँचला 'यांनी' केली धमाल!
  • ‘बॉईज २’च्या ट्रेलर लाँचला 'यांनी' केली धमाल!
  • ‘बॉईज २’च्या ट्रेलर लाँचला 'यांनी' केली धमाल!
SHARE

बॅाक्स आॅफिसवर गाजलेल्या ‘बॉईज’ या मराठी सिनेमाचा ‘बॉईज २’ हा सिक्वेल ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर मोठ्या थाटात प्रदर्शित करण्यात आला. सिक्वेलच्या निमित्ताने सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड ‘बॉईज’गिरीचा तोच धमाका घेऊन आले आहेत. 

मुंबईतील लोअर परळ येथे पार पडलेल्या या ट्रेलर लाँच कार्यक्रमात, तरुणांचा लाडका गायक अवधूत गुप्तेच्या लाईव्ह गाण्याने उपस्थितांची संध्याकाळ शानदार बनली. याखेरीज सुमंत शिंदे आणि सायली पाटील यांनीही आपल्या परफॅार्मंसद्वारे या सोहळ्यात रंग भरले.


अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘बॉईज २’चं संगीत प्रकाशित करण्यात आलं.


सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड या प्रमुख कलाकारांनी ‘बॉईज २’च्या ट्रेलर लाँचमध्येही धमाल केली.


मुख्य भूमिकेतील शुभांगी तांबळे, अक्षता पाडगावकर आणि सायली पाटील यांनी ‘बॉईज २’च्या सोहळ्याला ग्लॅमरस टच दिला.


सुमंत शिंदे आणि सायली पाटील यांच्या धडाकेबाज परफॅार्मंसने हा सोहळा आणखी रंगतदार बनवला.


अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर ही गायक-संगीतकार जोडी ‘बॉईज २’च्या निमित्ताने पुन्हा एकत्र आली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या