Advertisement

गणराजाच्या दरबारी पोहोचला ‘नशीबवान’


गणराजाच्या दरबारी पोहोचला ‘नशीबवान’
SHARES

कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाला वंदन करून करावी म्हणजे कार्य निर्विघ्नपणे पार पडतं, अशी धारणा आहे. सध्या सगळीकडे गणेशोस्तवाचं वातावरण असल्यानं ‘नशीबवान’ या आगामी मराठी सिनेमाच्या टीमने भक्तीभावाच्या याच धारणेतून गणराजाच्या दर्शनाने आपल्या सिनेमाच्या प्रमोशनचा श्रीगणेशा केला आहे.


बाप्पाच्या दर्शनाने प्रमोशनला सुरुवात

‘नशीबवान’ सिनेमाच्या टीमने नुकतंच गणेश गल्लीतील ‘मुंबईचा राजा’ आणि लालबाग मार्केटमधील ‘लालबागचा राजा’ या दोन मानाच्या गणपतींचं दर्शन घेऊन आपल्या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. ‘नशीबवान’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा भाऊ कदमदेखील यावेळी हजर होता. बाप्पाकडे ‘नशीबवान’ सिनेमाच्या यशाचं साकडं घालण्यासाठी सिनेमाची टीम पोहचली तेव्हा त्यांच्या जोडीला अभिनेते जयवंत वाडकरदेखील उपस्थित होते.


उदय प्रकाश लिखित ‘दिल्ली की दीवार’ या कथेवर आधारित असलेल्या ‘नशीबवान’ या सिनेमात भाऊ कदमच्या अभिनयाची एक वेगळीच छटा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात भाऊसोबत मिताली जगताप-वराडकर आणि नेहा जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अमोल गोळे यांनी केलं आहे. लवकरच प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातून आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा भुरळ घालण्यासाठी भाऊ सज्ज झाला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा