Advertisement

अक्षयची प्रस्तुती असलेल्या ‘चुंबक’ चं पहिलं पोस्टर


अक्षयची प्रस्तुती असलेल्या ‘चुंबक’ चं पहिलं पोस्टर
SHARES

बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केल्यापासून सर्वांनाच त्याची उत्सुकता लागली आहे. ‘चुंबक’ या मराठी सिनेमाची प्रस्तुती करत असल्याचं अक्षयने शुद्ध मराठीत एका व्हिडीओद्वारे सांगितलं. तेव्हापासून या सिनेमाची चर्चा सुरू आहे.


मराठी सिनेमाला अक्षयचा आधार 

अक्षयचं मराठी प्रेम सर्वश्रुत आहे. त्याचं अस्खलित मराठी बोलणंही अनेकांनी अनुभवलं आहे. मराठी कलाकार आणि सिनेमावरही तो मनापासून प्रेम करतो. आता ‘चुंबक’ च्या निमित्ताने तो एका वेगळ्या भूमिकेत मराठी सिनेमाला आधार देण्यासाठी पुढे सरसावला आहे. या सिनेमात एक वेगळीच चुंबकीय शक्ती असून, या शक्तीनेच अक्षय कुमारला प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेत खेचून आणलं आहे. ही शक्ती प्रेक्षकांनाही आकर्षित करण्यात यशस्वी होईल अशी आशा टीमच्यावतीने व्यक्त करण्यात येत आहे.


स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड

‘चुंबक’ या चित्रपटातील तीन मुख्य व्यक्तीरेखांपैकी एक असलेल्या बाळूचं पहिलं पोस्टर प्रकाशित करण्यात आलं आहे. बाळूच्या या भूमिकेत पुण्याचा साहिल जाधव हा किशोरवयीन कलाकार चंदेरी दुनियेत पदार्पण करत आहे. बाळू हा एका रेस्टॉरंटमधील वेटर आहे. तो आपलं छोटेसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतो आहे. हे स्वप्न त्याच्यावरील या पोस्टरमध्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. साहिल जाधव हा पुणे येथे राहणारा आणि शाळेत शिकणारा मुलगा आहे. ‘चुंबक’च्या माध्यमातून तो पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘चुंबक’ २७ जुलै २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.



हेही वाचा -

‘कट्टी बट्टी’ने ठोकलं शतक

तीन दशकांनंतर पुन्हा ‘मामला चोरीचा’


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा