Advertisement

फ्लोरा सैनीचं मराठी चित्रपटात पदार्पण


फ्लोरा सैनीचं मराठी चित्रपटात पदार्पण
SHARES

आज केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही मराठी सिनेमांचा नावलौकिक वाढला आहे. त्यामुळेच अमराठी भाषिक कलाकारांनाही मराठीचा लळा लागल्याचं पाहायला मिळत आहे. या कलाकारांच्या यादीत आता फ्लोरा सैनी या अभिनेत्रीचंही नाव जोडलं गेलं आहे.


फ्लोराची पावलंही मराठीकडे

फ्लोराची पावलंही मराठीकडे वळली असून, तिने ‘परी हूँ मैं’ या मराठी सिनेमात भूमिका साकारली आहे. फ्लोराने आपल्या कारकीर्दीची सुरुवात तेलुगू चित्रपटांपासून केली, त्यानंतर तमिळ, कन्नड, पंजाबी आणि हिंदी भाषेत ५० हून अधिक चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘लव्ह इन नेपाल’, ‘दबंग २’, ‘बेगमजान’, ‘धनक’ आदी हिंदी चित्रपटातील फ्लोराच्या भूमिका विशेष गाजल्या.


फ्लोराचा वेगळा अंदाज

‘परी हूं मैं’ या सिनेमात फ्लोरा पुन्हा एकदा एका वेगळ्या रुपात दिसणार आहे. दिघे कुटुंब, टीव्ही मालिका आणि रिअॅलीटी शोभोवती फिरणाऱ्या ‘परी हूँ मैं’ सिनेमाच्या कथानकात फ्लोराने नंदू माधव, देविका दफ्तरदार, बालकलाकार श्रुती निगडे या मराठमोळ्या कलाकारांसोबत अभिनय केला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा