Advertisement

पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत रवी काळे

‘व्हॅनिला स्ट्रोबेरी अँड चॉकलेट’ या आगामी मराठी चित्रपटात रवी यांची एक वेगळीच भूमिका पहायला मिळणार आहे. माथेरानमध्ये पर्यटकांना घोड्यावरून सैर घडवून आणणाऱ्या बाबू पवार या घोडेस्वाराची भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारली आहे.

पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत रवी काळे
SHARES

कोणत्याही भूमिकेला अचूक न्याय देण्याचं कसब अंगी असलेले अभिनेते रवी काळे यांनी मराठी– हिंदीसह तामिळ, तेलगु चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता पुन्हा एकदा ते वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहेत.


घोडेस्वाराची भूमिका 

‘व्हॅनिला स्ट्रोबेरी अँड चॉकलेट’ या आगामी मराठी चित्रपटात रवी यांची एक वेगळीच भूमिका पहायला मिळणार आहे. माथेरानमध्ये पर्यटकांना घोड्यावरून सैर घडवून आणणाऱ्या बाबू पवार या घोडेस्वाराची भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारली आहे. या भूमिकेसोबतच वडील आणि मुलीच्या नात्याचं हळवं रूपसुद्धा प्रेक्षकांना यात पहायला मिळणार आहे. ‘व्हॅनिला स्ट्रोबेरी अँड चॉकलेट’ हा चित्रपट १६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हळव्या मनाचे वडील

वडील आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत तिच्या अनोख्या मैत्रीचं स्वप्न साकारायला कशाप्रकारे मदत करतात, याचा संवेदनशील प्रवास या चित्रपटाच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे. या भूमिकेबद्दल बोलताना रवी काळे म्हणाले की, आतापर्यंत मी पडद्यावर ज्या भूमिका साकारल्या आहेत,  त्यापेक्षा ही वेगळी भूमिका आहे. माझी जी इमेज आहे त्यापेक्षा या रोलमध्ये वेगळेपण होतं म्हणून मी हा चित्रपट स्वीकारला. शिस्तप्रिय, कठोर पण हळव्या मनाच्या आदर्श वडिलांची ही भूमिका प्रत्येक वडील स्वत:शी रीलेट करू शकतील.


माथेरानमध्ये चित्रीकरण

माथेरानसारख्या नयनरम्य ठिकाणी पूर्णपणे चित्रीत झालेला ‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा पहिलाच चित्रपट आहे. रवी यांच्यासह नवोदित अभिनेत्री जानकी पाठक, राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव, आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व दिग्दर्शन अशी सगळी जबाबदारीही गिरीश विश्वनाथ यांनी सांभाळली आहे. संगीत शंतनू नंदन हेर्लेकर यांचं असून, जावेद अली, उपग्ना पंड्या, ऋतुजा लाड यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.



हेही वाचा - 

#MeToo : अभिनेते अलोक नाथ यांना न्यायालयाचा झटका; याचिका फेटाळली

आवाक्याबाहेर गेलेला अगड'बम’!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा