Advertisement

‘सत्यशोधक’मध्ये सावित्रीबाईंच्या भूमिकेत राजश्री देशपांडे

अलीकडेच राजश्रीची प्रमुख भूमिका असलेली 'सेक्रेड गेम्स' आणि संदीप कुलकर्णीची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेब सीरिज गाजल्या आहेत. त्यानंतर आता प्रथमच हे दोन्ही कलाकार एकत्र आले आहेत.

‘सत्यशोधक’मध्ये सावित्रीबाईंच्या भूमिकेत राजश्री देशपांडे
SHARES

मागील काही दिवसांपासून वेबसिरीजमधील हाॅट दृश्यांमुळं चर्चेत असलेला संदिप कुलकर्णी आता ज्योतीबा फुलेंच्या भूमिकेत दिसणार असून, राजश्री देशपांडे त्याची आॅनस्क्रीन पत्नी म्हणजेच सावित्रीबाई बनली आहे.


ज्योतिबांच्या चरित्रावर चित्रपट

मराठीसोबतच हिंदीमध्येही कसदार भूमिका साकारणारा संदिप कुलकर्णी आता महात्मा ज्योतीबा फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘सत्यशोधक’ या आगामी मराठी चित्रपटात संदिपचं हे रूप पहायला मिळेल. खरं तर या चित्रपटाची घोषणा जवळजवळ तीन-साडे तीन वर्षांपूर्वीच म्हणजे २०१५ मध्ये करण्यात आली होती, पण त्यानंतर पुढील कामासाठी बराच वेळ लागला. भारतीय समाज व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या ज्योतीबांच्या महान व्यक्तिमत्वाच्या जीवनचरित्राचा सखोल अभ्यास करून ते चित्रपटरूपात सादर करण्यात येणार असल्यानं ‘सत्यशोधक’ बनवताना कोणत्याही प्रकारे घाई करण्यात येत नसल्याचं समजतं.


५० टक्केच चित्रीकरण

अद्यापही या चित्रपटाचं ५० टक्केच चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या चित्रपटात संदिपच्या जोडीला सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत राजश्री देशपांडे दिसणार आहे. फुले दाम्पत्त्यावर आधारित असलेला 'सत्यशोधक' या वर्षअखेरीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच राजश्रीची प्रमुख भूमिका असलेली 'सेक्रेड गेम्स' आणि संदीप कुलकर्णीची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेब सीरिज गाजल्या आहेत. त्यानंतर आता प्रथमच हे दोन्ही कलाकार एकत्र आले आहेत. सावित्रीबाईंची भूमिका साकारणं हे जितकं आव्हानात्मक आहे, तितकंच ते जबाबदारीचंही काम असल्याचं राजश्री मानते.


नात्याचा वेध 

नीलेश जळमकर 'सत्यशोधक'चं दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटाचं लेखनही त्यांनीच केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती समता प्रॉडक्शन आणि कथाकार एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली केली जात आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचे विचार काळापुढचे होते. त्यांचं नातंही तसंच होतं. त्यांच्यातल्या नात्याचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळंच त्यांचे पुरोगामी विचार, त्यांचं कार्य, त्यांचं नातं यावर हा चित्रपट आधारित हा चित्रपट आहे.



हेही वाचा -

मांजरेकरांना नाचवणारा अमित बाइंग

'आंबेडकर' मालिकेसाठी शिवानी बनली रमाबाई





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा