मांजरेकरांना नाचवणारा अमित बाइंग

महेश मांजरेकर सध्या मराठी 'बिग बॉस २'मुळं चांगलेच चर्चेत आहेत. 'बिग बॉस २'च्या टायटल साँगमध्ये त्यांनी केलेला डान्स सर्वांनाच भावत असला तरी त्यांना नाचवणारा वेगळाच आहे.

  • मांजरेकरांना नाचवणारा अमित बाइंग
SHARE

महेश मांजरेकर सध्या मराठी 'बिग बॉस २' मुळं चांगलेच चर्चेत आहेत. 'बिग बॉस २'च्या टायटल साँगमध्ये त्यांनी केलेला डान्स सर्वांनाच भावत असला तरी त्यांना नाचवणारा वेगळाच आहे.


टायटल साँग गायलं

कोरियोग्राफर अमित बाइंग हे नाव मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी आणि गुजराती चित्रपटसृष्टीतही चांगलंच परिचयाचं आहे. मराठी, हिंदी, गुजराती या तिन्ही भाषांमधील आघाडीच्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या अमितनं मराठी 'बिग बॉस २'साठी चक्क महेश मांजरेकरांना नाचवलं आहे. 'बिग बॉस २' चं रॅपचिक टायटल साँग मांजरेकरांनी गायलंही आहे. या शोसाठी मांजरेकरांवर चित्रीत करण्यात आलेले विविध प्रोमोज प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यास कारणीभूत ठरत आहेत.


दोन्ही पर्वांची कोरियोग्राफी

अमितबाबत सांगायचं तर त्यानं यापूर्वी 'कॅनव्हासं', 'साहेब बीवी और गैंगस्टर', 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा', 'लालबागची राणी', 'चीटर', 'जाने क्यूँ दे यारों', 'जब तुम कहो' इत्यादी चित्रपटांसाठी कोरियोग्राफी केली आहे. मराठी 'बिग बॉस'च्या दोन्ही पर्वांच्या प्रोमो टाइटल सॉन्गची कोरियोग्राफीही अमितनंच केली आहे. मराठी 'बिग बॉस २'चं टायटल साँग नुकतंच एका दिमाखदार सोहळ्यात लॉन्च करण्यात आलं आहे. त्यावेळी अमीतनं कोरियोग्राफ केलेल्या 'बिग बॉस'च्या साँगवर मांजरेकरांसोबत तरुण डान्सर्सनी चांगलीच धमाल केली. 


कामाची पोचपावती

'बिग बॉस'च्या टायटल साँगवर मांजरेकरांना ठेका धरायला लावण्याबाबत अमित म्हणाला की, मी नेहमीच थीमनुसार क्रिएटीव्ह कोरियोग्राफी करण्याचा प्रयत्न करत असतो. मागच्या वेळेस मी महेशसरांसोबत काम केलं, तेव्हा खूप आंनद झाला होता. दडपणही तेवढंच होतं. मराठी 'बिग बॉस २'च्या प्रोमो टाइटल साँगची कोरियोग्राफी करण्याची संधी मिळणं ही मला माझ्या कामाची मिळालेली पोचपावती असल्याचं मानतो.हेही वाचा -

दारूच्या नशेत 'झिंगत' रिंकू देतेय शिव्या!

EXCLUSIVE : बाबो! अमोल कागणेला मराठीतच सावत्र वागणूक; चित्रपटात असूनही वगळलं नाव
संबंधित विषय
ताज्या बातम्या