Advertisement

दारूच्या नशेत 'झिंगत' रिंकू देतेय शिव्या!

'कागर' या चित्रपटात झळकलेली रिंकू सध्या काहीशी बिथरल्यासारखी वागत आहे. तिचा 'कागर' बॅाक्स आॅफिसवर चांगला व्यवसाय करू शकला नाही. त्यामुळं कदाचित सैरभैर झालेली रिंकू दारूच्या नशेत तर्रर्र होऊन शिव्या देतेय की काय असं काहींना वाटेल.

दारूच्या नशेत 'झिंगत' रिंकू देतेय शिव्या!
SHARES

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट'मुळं वन नाईट स्टार बनलेल्या रिंकू राजगुरूचं म्हणजेच सर्वांच्या लाडकी आर्चीचं काही तरी बिनसलं आहे. 'झिंगाट...'च्या तालावर नाचवरणारी रिंकू चक्क दारूच्या नशेत 'झिंगत' शिव्या देत आहे.



कधीही न पाहिलेलं रूप

'सैराट'मुळं मिळालेल्या अपार लोकप्रियतेनंतर दिग्दर्शक मकरंद मानेच्या 'कागर' या चित्रपटात झळकलेली रिंकू सध्या काहीशी बिथरल्यासारखी वागत आहे. तिचा 'कागर' बॅाक्स आॅफिसवर चांगला व्यवसाय करू शकला नाही. त्यामुळं कदाचित सैरभैर झालेली रिंकू दारूच्या नशेत तर्रर्र होऊन शिव्या देतेय की काय असं काहींना वाटेल, पण तसं काहीही नाही. आता लवकरच प्रेक्षकांना रिंकूचं आजवर कधीही न पाहिलेलं रूप पाहायला मिळणार आहे.


रावडी अंदाज

रिंकूच्या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'मेकअप' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये रिंकूचा काहीसा रावडी अंदाज पाहायला मिळणार आहे. यात एक बिनधास्त रिंकू आहे, पण ती इतकी बिनधास्त आहे की तिनं चक्क दारू ढोसली आहे. इतकंच नव्हे दारूच्या नशेत झिंगलेली रिंकू इंग्रजी, हिंदी आणि मराठीत बोलत शिव्याही देत आहे. तिनं चेक्स शर्ट आणि पँट परीधान केली आहे. एका उंच इमारतीवरील खिडकीत उभी राहून रात्रीच्या अंधारात ती 'सुनो घरवालो तुमच्या नानाची टांग...' असे संवाद बोलताना दिसते. दारूच्या नशेत ती बाटलीही फोडते.


टीझर प्रदर्शित

रिंकूचा हा अंदाज खरोखर आजवर कधीही न पाहिलेला आहे. 'मेकअप'च्या टीझरमध्ये अखेरीस रिंकू तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याचा इशारा करते आणि बाजूला शीर्षक येतं. त्याखाली लेखक-दिग्दर्शक गणेश पंडीत असंही लिहिलेलं दिसतं. यावरून या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन गणेश पंडीत यांनी केल्याचं समजतं. याची निर्मिती सोहम रॅाकस्टार एन्टरटेन्मेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एन्टरटेन्मेंट प्रा. लि., शेमारू एन्टरटेन्मेंट लि. च्या बॅनरखाली करण्यात येत असून, झी म्युझीक मराठीच्या वतीनं 'मेकअप'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रेक्षकांना रिंकूचा हा अंदाज कितपत भावतो ते पाहायचं आहे.



हेही वाचा -

EXCLUSIVE : बाबो! अमोल कागणेला मराठीतच सावत्र वागणूक; चित्रपटात असूनही वगळलं नाव

'बाबो'चा ट्रेलर अन् 'याना'चा गोंधळ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा