Advertisement

'बाबो'चा ट्रेलर अन् 'याना'चा गोंधळ

एका नवविवाहित दाम्पत्याला आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे. मात्र त्यांचा जागरण गोंधळ झालेला नाही आणि दुसरीकडं गावात अवकाशातील यान कोसळणार असल्याची बातमी येते. त्यानंतर गावात एकच कल्लोळ निर्माण होतो.

'बाबो'चा ट्रेलर अन् 'याना'चा गोंधळ
SHARES

रुपेरी पडद्यावर गोंधळात गोंधळ, गडबड घोटाळा, सावळा गोंधळ घालत आजवर बऱ्याच चित्रपटांची प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता 'बाबो' या आगामी मराठी चित्रपटातही असाच काहीसा गोंधळात गोंधळ पाहायला मिळणार आहे. 


ट्रेलर प्रदर्शित 

'बाबो' या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रसंगी अभिनेता सयाजी शिंदे, निर्माते सचिन पवार, सहनिर्माती तृप्ती पवार, दिग्दर्शक रमेश चौधरी यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. 'बाबो' या चित्रपटात एका गावात असणारे इरसाल नमुने व त्यांच्या भानगडी मिश्कील पद्धतीनं मांडण्यात आल्या आहेत. याची गंमतीशीर झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.


भांडणांची जुगलबंदी

ट्रेलरची सुरुवातच मुळात डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या एका सुंदर गावाचं चित्र दाखवत मंगलाष्टकानं होते. त्यात अमोल कागणेला भारत गणेशपुरे स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करताना दिसतो. किशोर कदम यांची सयाजी शिंदे यांच्याबरोबर गावाकडची खुमासदार शैलीतील भांडणांची जुगलबंदी पहायला मिळते. या गावाच्या अनेक समस्या आहेतच, पण त्याही पेक्षा मोठी समस्या एका नवविवाहित दाम्पत्याला आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे. मात्र त्यांचा जागरण गोंधळ झालेला नाही आणि दुसरीकडं गावात अवकाशातील यान कोसळणार असल्याची बातमी येते. त्यानंतर गावात एकच कल्लोळ निर्माण होतो.


३१ मे रोजी प्रदर्शित 

'बाबो'ची  कथा अरविंद जगताप यांनी लिहिली आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, किशोर कदम, भारत गणेशपुरे, अमोल कागणे यांच्यासोबत किशोर चौगुले, प्रतिक्षा मुणगेकर, निशा परुळेकर, विजय निकम, जयवंत वाडकर, रमेश चौधरी, विनोद शिंदे, मंजिरी यशवंत, स्मिता डोंगरे, प्रिया उबाळे, अरुण शिंदे, पुष्पा चौधरी, प्रकाश भागवत, वैशाली दाभाडे, आकाश घरत, ज्योती पाटील, प्रमोद पंडित, महेश देवकाते, गणेश कोकाटे, मयूर कोंडे, श्रेया पासलकर, विनोद शिंदे आदी कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. हा चित्रपट ३१ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 

लिंक - https://www.youtube.com/watch?v=khBfj_1_K50



हेही वाचा -

'मोगरा'साठी आनंद बनला बँक मॅनेजर

'टकाटक' जोडीचा गंमतीशीर ट्रेलर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा