Advertisement

'टकाटक' जोडीचा गंमतीशीर ट्रेलर

'टकाटक'चा विषय तसा मराठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांसाठी काहीसा बोल्ड वाटावा असाच आहे. आजवर मराठीत कधीही समोर न आलेली सेक्स कॅामेडी या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

'टकाटक' जोडीचा गंमतीशीर ट्रेलर
SHARES

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलेल्या 'टकाटक' या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या ट्रेलरमध्ये प्रथमेश परब आणि रितीका श्रोत्री 'टकाटक' जोडीची केमिस्ट्री पहायला मिळते.


ट्रेलर प्रदर्शित

'येड्यांची जत्रा', '४ इडियट्स', 'जस्ट गंमत', 'शिनमा' आणि '१२३४' या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'टकाटक' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात 'टाइमपास' फेम प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून, त्याच्या जोडीला रितीका श्रोत्री ही नवोदित अभिनेत्री आहे. समाजातील एखादा विषय गंमतीशीर शैलीत प्रेक्षकांसमोर मांडत त्यांना तो सहजपणे पटवून देणाऱ्या मिलिंदनं 'टकाटक'मध्ये नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याची झलक ट्रेलरमध्ये आहे.

 

सेक्स कॅामेडी

'टकाटक'चा विषय तसा मराठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांसाठी काहीसा बोल्ड वाटावा असाच आहे. आजवर मराठीत कधीही समोर न आलेली सेक्स कॅामेडी या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सेक्स कॅामेडीच्या नावाखाली वाह्यातपणा किंवा थिल्लरपणा न करता कथानकासाठी जे आवश्यक आहे तितकंच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रेमकथा आणि चित्रपटातील व्यक्तिरेखांभोवती गुंफण्यात आलेल्या प्रसंगांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण संदेशही या चित्रपटात देण्यात आला आहे.

 

नवी कोरी जोडी  

या चित्रपटात प्रथमेश-रितिका या नव्या कोऱ्या जोडीचा अभिनय पहायला मिळणार आहे. प्रथमेशनं आजवरच्या आपल्या कारकिर्दीत आपला एक वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. त्यांच्यासाठी हा चित्रपट एक वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. या चित्रपटात प्रथमेश-रितिकासोबत अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव,भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकारही विविध कॅरेक्टर्समध्ये दिसणार आहेत.

 

२८ जून रोजी प्रदर्शित

दिग्दर्शनासोबतच मिलिंद कवडे यांनी निर्माते अजय ठाकूर यांच्या साथीनं या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे. संजय नवगीरे यांनी अर्थपूर्ण संवादलेखन केलं आहे. प्रेमकथेचा गाभा लाभलेल्या 'टकाटक'साठी जय अत्रे यांनी गीतलेखन केलं आहे. ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी,इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे या निर्मात्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मुंबई, ठाणे, भोर तसेच गोवा येथील विविध लोकेशन्सवर शूट झालेला हा चित्रपट २८ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.


लिंक - https://youtu.be/OklpHkskjaI



हेही वाचा  -

मुक्ता बर्वेचं 'ब्रेव्ह' रिटर्न गिफ्ट

प्रथमेश-मिलिंदचं ‘टकाटक’ पोस्टर पाहिलं का?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा